Zika Virus : चिंताजनक! कर्नाटकमध्ये सापडला झिका व्हायरसचा पहिला रुग्ण; 5 वर्षीय मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 12:02 PM2022-12-13T12:02:40+5:302022-12-13T12:13:15+5:30

Zika Virus : कर्नाटकमध्ये एका पाच वर्षांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. 

zika virus first case in karnataka report five year old girl find positive doctor on alert | Zika Virus : चिंताजनक! कर्नाटकमध्ये सापडला झिका व्हायरसचा पहिला रुग्ण; 5 वर्षीय मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

Zika Virus : चिंताजनक! कर्नाटकमध्ये सापडला झिका व्हायरसचा पहिला रुग्ण; 5 वर्षीय मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

Next

देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असतानाच आता पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. कर्नाटकमध्ये झिका व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला आहे. एका 5 वर्षीय मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या घटनेनंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून डॉक्टर देखील अलर्ट झाले आहेत. कर्नाटकमध्ये एका पाच वर्षांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. 

झिका व्हायरसचा रुग्ण आढळून आल्यानंतर सरकारने योग्य ती पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील लॅब रिपोर्टनुसार, कर्नाटकच्या रायचूरमध्ये ही घटना घडली आहे. आरोग्य मंत्री के सुधाकर यांनी कर्नाटकमध्ये जीका व्हायरस सापडण्याची ही पहिलीच केस असल्याचं म्हटलं आहे. सरकार या स्थितीकडे बारकाईने लक्ष ठेवणार आहे. झिका व्हायरसला सामोरे जाण्यासाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सुसज्ज असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

"झिका व्हायरस बाबतीत सरकार अलर्ट मोडवर आहे. त्याचबरोबर सर्व खबरदारी देखील घेत आहे. राज्यातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. कोणत्याही रुग्णालयात संशयित संसर्ग आढळून आल्यास झिका व्हायरसची चाचणी करून घ्यावी असं अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे" अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. तसेच लॅबमध्ये तीन सँपल पाठवण्यात आले होते. त्यापैकी दोन निगेटिव्ह आले असून एक रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: zika virus first case in karnataka report five year old girl find positive doctor on alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.