शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
2
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
3
११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
4
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
5
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
6
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
7
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
8
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
9
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
10
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
11
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
12
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
13
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
14
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
15
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
16
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
17
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
18
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
19
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
20
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

यूएन अधिकाऱ्यांच्या गुन्ह्यांवर 'झिरो टॉलरन्स' हवा: ॲड उज्ज्वल निकम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 21:43 IST

यूएन अधिकाऱ्यांच्या गुन्ह्यांवर 'झिरो टॉलरन्स' हवा, अशी मागणी खासदार आणि ॲड. उज्ज्वल निकम यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत केली.

>> नरेश डोंगरे

नागपूर: "संयुक्त राष्ट्रांच्या अधिकान्यांकडून होणारे गुन्हे 'संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवू शकतात, असे परखड मत खासदार आणि प‌द्मश्री अॅड. उज्ज्वल निकम  यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत मांडले. यूएन अधिकारी आणि मिशनवरील तज्ञांची गुन्हेगारी जबाबदारी निश्चित करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणीही यावेळी निकम यांनी केली.

महासभेच्या सहाव्या समितीसमोर (कायदे विषयक संबंधाने बोलताना  निकम यांनी स्पष्ट केले की, अशा गुन्हयांवर निर्णायक कारवाई करण्याची जबाबदारी सदस्य देश आणि संयुक्त राष्ट्र संघ दोघांचीही आहे. त्यांनी या गुन्हयांबाबत भारताची 'झिरो टॉलरन्स (शून्य-सहिष्णुता) भूमिका मांडली आणि पीडितांसाठी स्थापन केलेल्या निधीमध्ये अधिक आर्थिक योगदान देण्याचे आवाहन केले.

उज्ज्वल निकम हे सध्या भारताच्या राजनैतिक प्राधान्यक्रमांना पुढे नेण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये एका उच्च-स्तरीय, बहुपक्षीय भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे प्रमुख सदस्य म्हणून दौऱ्यावर आहेत. त्यांनी या संबंधाने थेट न्यू यार्क मधून लोकमतशी बोलताना म्हटले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची कणखर भूमिका आपण मांडलेली आहे. आमच्या शिष्टमंडळाने जमैका आणि फ्रान्सच्या स्थायी प्रतिनिधींसोबत महत्वपूर्ण चर्चा केली आहे, तसेच आंतरराष्ट्रीय संकट गटाच्या धोरण तजांशीही संवाद साधला आहे.

या दौऱ्यात भारताचे तंत्रज्ञानातील नेतृत्व आणि परदेशस्थ भारतीयांशी असलेले संबंध यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यावेळी भारतीय खासदारांनी संयुक्त राष्ट्रांचे तंत्रज्ञान दूत  अमनदीप सिंग गिल यांची भेट घेऊन Al गव्हर्नन्स आणि डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरवर चर्चा केल्याची माहिती त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधींना दिली. एका विशेष कार्यक्रमात १० हुन अधिक भारतीय-अमेरिकन समुदायाच्या नेत्यांशी संवाद साधला असता त्यांनी अमेरिका-भारत भागीदारीतील त्यांच्या योगदानाचे कौतुक केल्याची माहिती दिली.

८ ते १० ऑक्टोबर २०२५ दरम्यान संयुक्त राष्ट्र मुख्यालयात सुरु असलेल्या या संमेलनात अनेक उच्च-स्तरीय बैठका पार पडल्याचेही निकम यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. १७ ऑक्टोबरला विशिष्ट मंडळ भारतात परत येणार असल्याची माहिती एडवोकेट निकम यांनी लोकमतला दिली.

भारताचे धोरण लेचेपेचे नाहीप्रत्येक देशाच्या सुरक्षे संबंधाने तसेच आंतरराष्ट्रीय गुन्ह्या संबंधाने भारताचे धोरण लेचेपेचे नाही तर अत्यंत कणखर आहे, असा संदेश या परिषदेचे देण्यात भारतीय शिष्टमंडळ यशस्वी ठरल्याचेही एड  उज्वल निकम यांनी लोकमत प्रतिनिधीला सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : U.N. Officials' Crimes Require 'Zero Tolerance': Adv. Ujjwal Nikam

Web Summary : Adv. Ujjwal Nikam addressed the UN, advocating for 'zero tolerance' towards crimes by UN officials. He stressed accountability and urged increased contributions to victim funds. Nikam highlighted India's firm stance and discussed technology leadership with UN representatives, emphasizing strong U.S.-India ties during his New York visit.
टॅग्स :Ujjwal Nikamउज्ज्वल निकमPoliticsराजकारण