वादग्रस्त इस्लामिक प्रचारक झाकीर नाईकचा पासपोर्ट रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 20:22 IST2017-07-18T20:22:21+5:302017-07-18T20:22:21+5:30
वादग्रस्त इस्लामिक प्रचारक झाकीर नाईक याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. मनी लाँडरिंग आणि दहशतवाद्यांना आर्थिक रसद

वादग्रस्त इस्लामिक प्रचारक झाकीर नाईकचा पासपोर्ट रद्द
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - वादग्रस्त इस्लामिक प्रचारक झाकीर नाईक याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. मनी लाँडरिंग आणि दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी चौकशीसाठी एनआयएसमोर उपस्थित न राहिल्याने त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. आरोप झाल्यापासून झाकीर नाईक हा भारताबाहेर आहे . याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने आदेश दिल्यानंतर मुंबईतील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने त्याचा पासपोर्ट रद्द केला आहे.
झाकीर नाईचा पासपोर्ट रद्द करण्यासाठी एनआयएने विनंती केल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भातील प्रक्रिया आठवडाभरापूर्वीच सुरू केली होती. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागळे यांनी सांगितले की, एनआयएने काही दिवसांपूर्वी झाकीर नाईकचा पासपोर्ट रद्द करण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
अधिक वाचा
(झाकीर नाईकविरोधात NIA कोर्टानं अजामीनपात्र अटक वॉरंट केलं जारी )
( झाकीर नाईकच्या संस्थेच्या परदेशी देणग्या होणार बंद )
(झाकीर नाईकला अटकेची भीती, वडिलांच्या अंत्यसंस्काराला येणं टाळलं )
अधिक वाचा
(झाकीर नाईकविरोधात NIA कोर्टानं अजामीनपात्र अटक वॉरंट केलं जारी )
( झाकीर नाईकच्या संस्थेच्या परदेशी देणग्या होणार बंद )
(झाकीर नाईकला अटकेची भीती, वडिलांच्या अंत्यसंस्काराला येणं टाळलं )
गेल्या वर्षी बांगलादेशात ढाकातील उपाहारगृहात स्फोट झाल्यानंतर अटक केलेल्यांपैकी काहींनी नाईक यांच्या प्रवचनांवरून स्फूर्ती घेतल्याची कबुली दिली. यानंतर त्यांच्याविरुद्ध समाजात वितुष्ट निर्माण करणे याखेरीज बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. याखेरीज केंद्र सरकारने स्वतंत्र कारवाई करून इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बंदी घालून देणगी स्वीकारण्यास प्रतिबंध केला होता.
एनआयएने १८ नोव्हेंबर २०१६ रोजी नाईकच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. तसेच नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनलाही बेकायदेशीर घोषित करण्याता आले आहे. तसेच त्याचे एनजीओ आणि टीव्ही चॅनेलवरही बंदी घालण्यात आली आहे.