दंगलीतील आरोपी भाजप आमदारास झेड श्रेणीची सुरक्षा
By Admin | Updated: February 18, 2015 23:54 IST2015-02-18T23:54:16+5:302015-02-18T23:54:16+5:30
लखनौ : उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर दंगल प्रकरणातील आरोपी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार सुरेश राणा यांच्या सुरक्षेत वाढ करताना केंद्र सरकारने त्यांना झेड श्रेणीची सुरक्षा दिली असून, आता देशातील सर्वाधिक सुरक्षित राजकारण्यांमध्ये त्यांचा समावेश झाला आहे.

दंगलीतील आरोपी भाजप आमदारास झेड श्रेणीची सुरक्षा
ल नौ : उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर दंगल प्रकरणातील आरोपी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार सुरेश राणा यांच्या सुरक्षेत वाढ करताना केंद्र सरकारने त्यांना झेड श्रेणीची सुरक्षा दिली असून, आता देशातील सर्वाधिक सुरक्षित राजकारण्यांमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. मुजफ्फरनगरमध्ये २०१३ साली उफाळलेल्या दंगलीपूर्वी काही दिवस प्रक्षोभक भाषणे केल्याच्या आरोपावरून राणा यांना अटक करण्यात आली होती. नुकतीच त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. या दंगलीत ६० लोक ठार झाले होते. आता एक पायलट कार आणि सशस्त्र सुरक्षा दलाशिवाय ३२ कमांडो या आमदाराच्या सुरक्षेसाठी २४ तास तैनात राहतील. त्यांच्या जिवाला असलेला धोका आणखी वाढला असल्याचे स्थानिक आढाव्यातून निदर्शनास आल्यानंतर त्यांची सुरक्षा वाढविण्यात आल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे, तर आपल्याविरुद्धच्या खोट्या प्रकरणांमुळे आपला जीव धोक्यात आल्याचा या आमदार महोदयांचा दावा आहे. दंगलींनंतर उत्तर प्रदेश सरकारने आमच्याविरुद्ध अनेक खोटी प्रकरणे दाखल केली. त्यामुळे आपले शत्रू वाढले, असे राणा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. या दंगलीतील आणखी एक आरोपी भाजपचे आमदार संगीत सोम यांना गेल्या ऑगस्ट महिन्यात झेड श्रेणीची सुरक्षा व्यवस्था देण्याच्या निर्णयानंतर गृहमंत्रालयाला तीव्र टीकेचा सामना करावा लागला होता. त्याचवेळी राणा यांनीसुद्धा झेड श्रेणीची सुरक्षा मागितली होती. दरम्यान, राज्यातील भाजप नेत्यांनी मात्र राणा यांच्याविरुद्धचे गुन्हे राजकीयदृष्ट्या प्रेरित असून त्यांच्या जिवाला खरंच धोका असल्याचे सांगत सुरक्षा वाढीचा वाद वाढविण्याचे टाळले. विशेष म्हणजे गेल्यावर्षीच्या राष्ट्रीय प्रचारादरम्यान आग्रा येथे एका सभेत या दोन वादग्रस्त आमदारांचा सत्कार करण्यात आला होता. या सभेला नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले होते.