युवीला होते अंमली पदार्थांचे व्यसन - आकांक्षा शर्मा
By Admin | Updated: October 31, 2016 19:15 IST2016-10-31T19:15:09+5:302016-10-31T19:15:09+5:30
युवराजच्या भावाची पत्नी आकांक्षा शर्मा हिने युवीबाबत खळबळजनक खुलासा केला आहे. युवराजला अंमली पदार्थांच्या सेवनाचे व्यसन होते, असा दावा तिने केला आहे.

युवीला होते अंमली पदार्थांचे व्यसन - आकांक्षा शर्मा
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - रणजी क्रिकेटच्या यंदाच्या हंगामात युवराज सिंह जबरदस्त फलंदाजी करत आहे. धडाकेबाज फलंदाजीमुळे त्याचे संघातील पुनरागमन निश्चित मानले जात आहे. मात्र असे असतानाच युवराजच्या भावाची पत्नी आकांक्षा शर्मा हिने युवीबाबत खळबळजनक खुलासा केला आहे. युवराजला अंमली पदार्थांच्या सेवनाचे व्यसन होते. तसेच त्याला धुम्रपानाचीही सवय असल्याचा दावा तिने केला आहे.
आकांक्षा शर्मा बिग बॉसच्या यंदाच्या पर्वात सहभागी झाली होती. मात्र तिला लवकरच बिग बॉसच्या घरातून एक्झिट घ्यावी लागली होती. आता एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली की," युवराजला अंमली पदार्थांचे सेवन करण्याची सवय होती. तसेच आपल्याला धुम्रपान करायची सवय असल्याचेही त्याने मला सांगितले होते, असे आकांक्षा या मुलाखतीत म्हणाली.
यावेळी आकांक्षाने युवराजची आई शबनम सिंह हिच्याविषयीसुद्धा मोकळेपणाने आपले मत मांडले. तसेच युवीचा भाऊ जोरावर सिंह आणि आपले लग्न केवळ कागदावरच झाले आहे. असेही ती म्हणाली.