मॅकनरो प्रमाणे युवराज क्राऊडपुलर
By Admin | Updated: December 23, 2015 18:12 IST2015-12-23T18:12:11+5:302015-12-23T18:12:11+5:30
जवळपास दीडवर्षाने भारतीय संघात पुनरागमन करणा-या युवराज सिंगचे माजी कर्णधार कपिल देव यांनी भरभरुन कौतुक केले आहे.

मॅकनरो प्रमाणे युवराज क्राऊडपुलर
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - जवळपास दीडवर्षाने भारतीय संघात पुनरागमन करणा-या युवराज सिंगचे माजी कर्णधार कपिल देव यांनी भरभरुन कौतुक केले आहे. कपिलने युवराजची तुलना जॉन मॅकनरो आणि दिएगो मॅराडोनाशी केली.
युवराज हा उत्साही क्रिकेटपटू आहे. प्रेक्षक टेनिस कोर्टवर मॅकनरो आणि फुटबॉलच्या मैदानावर मॅराडोनाला खास पाहण्यासाठी यायचे. युवराज हा त्या प्रकारामध्ये मोडणारा खेळाडू आहे. मैदानावर युवराजची फलंदाजी पाहायला प्रेक्षकांना आवडते. तो मॅचविनर आणि ख-या अर्थाने क्राउडपुलर आहे अशा शब्दांमध्ये त्यांनी युवराजची स्तुती केली. तो पाचव्या, सहाव्या कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करु शकतो, तो अनुभवी खेळाडू आहे असे कपिल म्हणाला.
विजय हजारे करंडक स्पर्धेत केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे युवराजची ऑस्ट्रेलिया दौ-यासाठीच्या टी-२० च्या भारतीय संघात निवड झाली आहे.