शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

"गुजरात सरकार मला त्रास देतंय..."; TMC खासदार युसूफ पठाण यांची हायकोर्टात धाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 12:46 IST

Yusuf Pathan : काही दिवसांपूर्वी युसूफ पठाण यांना बडोदा महापालिकेची सरकारी जमीन रिकामी करण्याची नोटीस मिळाली होती

टीएमसी खासदार आणि माजी क्रिकेटर युसूफ पठाण यांनी गुजरात सरकारकडून आपल्याला त्रास होत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, युसूफ पठाण यांना बडोदा महापालिकेकडून अतिक्रमणाची नोटीस मिळाली होती. त्यानंतर युसूफ पठाण यांनी हे आरोप केले आहेत. तसेच, याप्रकरणी युसूफ पठाण यांनी गुजरातउच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. त्यामुळे आता गुजरात उच्च न्यायालयात महापालिकेला नोटीस पाठवून याबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी युसूफ पठाण यांना बडोदा महापालिकेची सरकारी जमीन रिकामी करण्याची नोटीस मिळाली होती. याबाबत युसूफ पठाण यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून २०१२ सालीच ही जागा घेण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केल्याचे सांगितले. तसेच, २०१४ मध्ये महापालिकेने वेगळा प्रस्ताव आणून राज्य सरकारकडे पाठवला होता.याबाबत उच्च न्यायालयाने १० वर्षांपासून कोणतीच कारवाई का केली नाही, अशी विचारणा केली. 

यावर युसूफ पठाण म्हणाले की, मी नुकताच लोकसभा निवडणुकीत निवडून आलो असून, मी दुसऱ्या पक्षातून निवडून आल्यामुळे मला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, गेल्या १० वर्षांपासून काहीही केले नाही आणि अचानक निवडणूक निकालानंतर ६ जून रोजी नोटीस पाठवण्यात आली, असे युसूफ पठाण यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, महापालिकेच्या प्रस्तावानंतर तो पुन्हा राज्य सरकारकडे पाठविण्यात आला. त्याची गरज नव्हती, कारण ही जागा राज्य सरकारची नसून महापालिकेची आहे. 

काय आहे प्रकरण?युसूफ पठाण यांच्यावर भाजपचे माजी नगरसेवक विजय पवार यांनी सरकारी भूखंड हडपल्याचा आरोप केला आहे. पवार यांच्या आरोपानंतर बडोदा महापालिकेने युसूफ पठाण यांनी नोटीस बजावली आहे. वडोदरा महानगरपालिकेने हा भूखंड युसूफ पठाणला देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप विजय पवार यांचा आहे. तसेच, याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. मात्र राज्य सरकारने महापालिकेची शिफारस फेटाळून लावली होती. असे असतानाही युसूफ पठाणने भूखंड ताब्यात घेऊन घर बांधले. सध्या हा भूखंड युसूफ पठाणच्या ताब्यात आहे. अशा परिस्थितीत हे घर जमीनदोस्त करायला हवे, अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेवकाची आहे. 

टॅग्स :Yusuf Pathanयुसुफ पठाणGujaratगुजरातHigh Courtउच्च न्यायालयTrinamool Congressतृणमूल काँग्रेस