युवकांनी पाकिस्तानचा झेंडा तुडवला

By Admin | Updated: May 4, 2017 20:05 IST2017-05-04T20:05:33+5:302017-05-04T20:05:33+5:30

दोन भारतीय जवानांचे शिरच्छेद करून विटंबना करणा-या पाकिस्तानविरोधात भारतामधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Youth trampled Pakistan's flag | युवकांनी पाकिस्तानचा झेंडा तुडवला

युवकांनी पाकिस्तानचा झेंडा तुडवला

>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 4 - दोन भारतीय जवानांचे शिरच्छेद करून विटंबना करणा-या पाकिस्तानविरोधात भारतामधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विविध संघटनांतडून पाकिस्तानचे पुतळे जाळण्यात येत आहेत तर  गुजरातमधील आनंद जिल्ह्यातील युवकांनी वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदविला.
 
येथील युवकांनी पाकिस्तानच्या  झेंड्याचे चित्र रस्त्यावर साकारले. त्या झेंड्यावर उभे राहून भारतीय ध्वज हातात घेऊन युवकांनी पाकिस्तानविरुद्ध घोषणाबाजी केली.
 
या प्रकरणी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान आणि पाकिस्तानचा झेंडा भारताच्या रस्त्यावर काढल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी नंतर पाकिस्तानी झेंड्याच्या जागी पांढरा रंग मारला.
 
1 मे रोजी दोन भारतीय जवानांचे शिरच्छेद करून विटंबना करणा-या पाकिस्तानी सैन्याच्या नापाक कृतीचा देशभरातून निषेध करण्यात येत आहे.  
 

Web Title: Youth trampled Pakistan's flag