शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

जीवघेणी बेकारी; देशात दर 2 तासांत 3 बेरोजगारांच्या आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 12:57 IST

शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्यांचं प्रमाण अधिक

नवी दिल्ली: नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीतून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. २०१७-१८ वर्षात शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्या जास्त असल्याचं एनसीआरबीच्या आकडेवारीतून उघड झालं आहे. २०१८ मध्ये १२ हजार ९३६ जणांनी बेरोजगारीला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली. याच कालावधीत १० हजार ३४९ शेतकरी आणि शेतमजूरांनी मृत्यूला कवटाळलं. देशात बेरोजगारीच्या संकटानं गंभीर स्वरुप धारण केल्याचं या आकडेवारीनं अधोरेखित केलं आहे. एनसीआरबी गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी संस्था आहे. देशात घडणारे गुन्हे, आत्महत्या, त्यांच्या मागील कारणं यांची आकडेवारी नोंदवण्याचं काम एनसीआरबी करते. २०१८ मध्ये देशातल्या आत्महत्यांचं प्रमाण ३.६ टक्क्यांनी वाढल्याचं एनसीआरबीच्या आकडेवारीतून समोर आलं आहे. २०१८ मध्ये देशभरात १ लाख ३४ हजार ५१६ आत्महत्या झाल्या. तर २०१७ मध्ये २९ हजार ८८७ आत्महत्या झाल्या होत्या. देशात आर्थिक मंदीसदृश्य वातावरण असल्याचं प्रतिबिंब एनसीआरबीच्या आकडेवारीतून स्पष्टपणे दिसत आहे. २०१८ मध्ये दिवसाकाठी ३५ जणांनी बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केली. तर २०१७ मध्ये दर दिवशी सरासरी ३४ जणांनी बेकारीला कंटाळून जीवनयात्रा संपवली होती. २०१६ मध्ये हाच आकडा ३० इतका होता. २०१७ मध्ये १२ हजार २४१ बेरोजगारांनी आत्महत्या केली. तर १० हजार ६५५ शेतकरी, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. २०१६ मध्ये बेरोजगारांच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण जास्त होतं. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार २०१६ मध्ये ११ हजार ३७९ शेतकरी आणि शेतकरी मजूरांनी आत्महत्या केली होती. याच कालावधीत नोकरी नसल्यानं आत्महत्या केलेल्यांची संख्या ११ हजार १७३ इतकी होती.  

टॅग्स :Unemploymentबेरोजगारीfarmer suicideशेतकरी आत्महत्या