शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या हत्येची ‘सुपारी’ मागणाऱ्या तरुणास अटक; फेसबुकवर पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 01:49 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येची ‘सुपारी’ द्यायला कोणी तयार आहे का? अशी विचारणा करणारी पोस्ट फेसबूकवर टाकणाऱ्या एका ३१ वर्षांच्या युवकाला जयपूर पोलिसांनी गुरुवारी देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक केली.

जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येची ‘सुपारी’ द्यायला कोणी तयार आहे का? अशी विचारणा करणारी पोस्ट फेसबूकवर टाकणाऱ्या एका ३१ वर्षांच्या युवकाला जयपूर पोलिसांनी गुरुवारी देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक केली.पूर्व विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल जैन यांनी या आरोपीचे नाव नवीन कुमार यादव असे असल्याचे सांगितले. यादव मूळचा हरियाणातील रेवाडीचा असून तो जयपूरच्या त्रिवेणीनगर भागात पुस्तकाचे दुकान चालवितो. त्याच्याविरुद्ध भादंवि कलम १२४ ए (देशद्रोह), ५०५ बी (सार्वजनिक शांततेचा भंग करणे) व ५०६ (धमकावणे) या कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.‘मोदींची हत्या करण्याची सुपारी द्यायला कोणी तयार आहे का? माझ्याकडे त्यासाठी एक योजना तयार आहे,’ अशी पोस्ट यादव याने २६ मार्च रोजी फेसबूक वॉलवर टाकली होती. उपायुक्त यादव म्हणाले की, या आक्षेपार्ह फेसबूक पोस्टबद्दल पोलीस नियंत्रण कक्षाकडे तक्रार आल्यानंतर सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने ती पोस्ट कोणी व कुठून टाकली याचा छडा लावून यादव यास अटक केली गेली.फेसबूकवर आपण अशी पोस्ट टाकली होती व काही लोकांनी आक्षेप घेतल्यानंतर आपण नंतर ती मागे घेतली, अशी कबुली यादव याने जाबजबाबांत दिल्याचेही उपायुक्त जैन यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)तात्त्विक मतभेदमोदींनी केलेले काम आपल्याला पसंत नाही व त्यांच्याशी तात्त्विक मतभेद असल्याने त्यांच्या हत्येचा मानस प्रकट केला, असे समर्थन यादव याने केल्याचेही जैन म्हणाले. ठाणेदार मानवेंद्र सिंग म्हणाले की, यादव याने मोदी व केंद्र सरकारवर टीका करणारा मजकूर यापूर्वीही सोशल मीडियातून प्रसिद्ध केला होता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCrime Newsगुन्हेगारी