गोपालनगरात तरुणाने लावला गळफास
By Admin | Updated: February 6, 2015 01:17 IST2015-02-06T01:17:29+5:302015-02-06T01:17:29+5:30
नागपूर : गोपालनगरातील एका तरुणाने आज गळफास लावून आत्महत्या केली. राहुल कैलास सेलोटे (वय २७) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो गोपालनगर तिसऱ्या बसथांब्याजवळ राहात होता.

गोपालनगरात तरुणाने लावला गळफास
न गपूर : गोपालनगरातील एका तरुणाने आज गळफास लावून आत्महत्या केली. राहुल कैलास सेलोटे (वय २७) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो गोपालनगर तिसऱ्या बसथांब्याजवळ राहात होता. घरापासून काही अंतरावरच राहुलचे छोटू पान पॅलेस आहे. राहुलच्या पारिवारीक सूत्रानुसार, गेल्या काही दिवसांपासून तो अस्वस्थ होता. कुणाला काही सांगतही नव्हता. आज सकाळपासून तो घरीच होता. त्यामुळे त्याचे मित्र सचिन आज रात्री ७ च्या सुमारास त्याच्या घरी गेले. राहुलच्या घराचे दार उघडेच होते. घरी कुणीच नव्हते. त्यामुळे आवाज देताच सचिन सरळ राहुलच्या खोलीत गेले. त्यांना राहुल गळफास लावून दिसला. सचिनने आरडाओरड करून बाजूलाच राहणारे काका आणि इतरांना बोलविले. सर्वांनी मिळून राहुलला पडोळे हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी तपासणी करून राहुलला मृत घोषित केले. परिसरात शोककळाराहुल मनमिळावू स्वभावाचा होता. त्यामुळे परिसरात त्याचा मोठा मित्रपरिवार होता. आई आशाताई (वय ४७) या गृहिणी असून, बहिणीचे लग्न झाले आहे. लहान भाऊ नीलेश (वय २२) इंटरनेट कॅफे संचलित करतो. राहुलच्या आत्महत्येची वार्ता कळताच अनेकांनी पडोळे हॉस्पिटलकडे धाव घेतली. माहिती कळताच प्रतापनगर पोलिसही पोहोचले. पोलिसांनी तूर्त आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, राहुलच्या आत्महत्येचे कारण शोधले जात आहे.---