कोर्ट चौकात तरुणांमध्ये हाणामारी

By Admin | Updated: July 9, 2016 00:02 IST2016-07-09T00:02:41+5:302016-07-09T00:02:41+5:30

जळगाव : किरकोळ कारणावरून तीन ते चार तरुणांमध्ये हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमाराम कोर्ट चौकात घडली. या हाणामारीमुळे चौकात बघ्यांची गर्दी जमली होती. हाणामारी करणार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

Youth fighters in court | कोर्ट चौकात तरुणांमध्ये हाणामारी

कोर्ट चौकात तरुणांमध्ये हाणामारी

गाव : किरकोळ कारणावरून तीन ते चार तरुणांमध्ये हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमाराम कोर्ट चौकात घडली. या हाणामारीमुळे चौकात बघ्यांची गर्दी जमली होती. हाणामारी करणार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
प्राप्त माहितीनुसार, आसोदा रस्त्यावर राहणार्‍या एका अल्पवयीन तरुणाचे किरकोळ कारणावरून शिवाजीनगरात राहणार्‍या दुसर्‍या तरुणाशी वाद झाला. दोघांनी आपापल्या सहकार्‍यांना भ्रमणध्वनीवरून चौकात बोलावून घेतले. त्यानंतर जमलेल्या तरुणांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याने हा वाद विकोपाला गेला. चौकात वाद झाल्याचे पाहून तेथे कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचार्‍यांनी मध्यस्थी करीत तरुणांना तेथून काढले. पुढे टॉवर चौकातही हे तरुण एकमेकांत भिडल्याने हा वाद शहर पोलीस ठाण्यापर्यंत गेला. याप्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी त्यांच्या आई-वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावले. तरुणांना समज दिल्यावर वादावर पडला पडला.

Web Title: Youth fighters in court