मनपा कार्यालयापुढे युवक काँग्रेसचे धरणे
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:27+5:302015-01-23T23:06:27+5:30

मनपा कार्यालयापुढे युवक काँग्रेसचे धरणे
>फोटो ओळी....सिव्हिल लाईन येथील मनपा कार्यालयासमोरील धरणे आंदोलनात सहभागी शहर जिल्हा युवक काँग्रेसचे कार्यकर्ते महापौरांना निवेदन : इंदिरा गांधी रुग्णालयात सुविधा उपलब्ध करण्याची मागणीनागपूर : महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयाचा अनागोंदी कारभार व असुविधाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहर जिल्हा युवक कॉंग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी युवानेते मंगेश कामोने यांच्या नेतृत्वात शुक्र वारी मनपा कार्यालयापुढे धरणे दिले. यावेळी महापौर प्रवीण दटके व आयुक्त श्रावण हर्डीकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागात उपकरणांचा अभाव आहे. डॉक्टर व परिचारिका उपस्थित नसतात. स्वच्छतेचा अभाव असून घाणीचे साम्राज्य आहे. येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. गरीब रुग्णांना उपचार मिळत नाही . याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मनपाच्या पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात रुग्णालयाच्या नुतनीकरणासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.आंदोलनात विनायक इंगोले, वैभव काळे, विशाल वाघमारे, सुबोध सवाईथूल, विकास सेलोकर, रणजित बोराडे, नितीन कुमरे, समीर यादव, दुर्गेश मसराम, प्रकाश दुबे, संकेत कांबळे, समीर मेश्राम, विक्की तायडे, आकाश तायवाडे, रमेश काळे, सुगराम भंडारी आदींचा समावेश होता.(प्रतिनिधी)