तरुणाची गळफास लावून आत्महत्या
By Admin | Updated: August 22, 2015 00:43 IST2015-08-22T00:43:33+5:302015-08-22T00:43:33+5:30
(फोटो-पासपोर्ट)

तरुणाची गळफास लावून आत्महत्या
(फ ोटो-पासपोर्ट)तरुणाची गळफास लावून आत्महत्यामनसर : तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनसर येथे गुरुवारी मध्यरात्री घडली.लक्ष्मण जंगलू शेंदरे (२८, रा. गोवारीपुरा, मनसर, ता. रामटेक) असे मृत तरुणाचे नाव आहे. लक्ष्मण हा ट्रकवर कामगार म्हणून काम करायचा. गुरुवारी मध्यरात्री त्याने स्वत:च्या घरी खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी तो जागा न झाल्याने घरच्या मंडळींनी त्याला आवाज दिला. प्रतिसाद न मिळाल्याने खोलीचे दार तोडले असता, तो लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. या प्रकरणी रामटेक पेालिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. (वार्ताहर)***विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू नागपूर : विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरी (वाघ) येथील फॉर्म हाऊसजवळ गुरुवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.मनोज मदन पंधरे (२०, रा. पेरडीपार, मध्य प्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे. मनोज हा उमरी (वाघ) शिवारातील फॉर्म हाऊसमध्ये काम करायचा. गुरुवारी सकाळी पाणी आणत असताना त्याचा पाय दगडावर पडला आणि तोल गेल्याने तो खाली कोसळला. त्याचा स्पर्श विजेच्या खांबाला झाला. त्या खांबामध्ये वीज प्रवाह प्रवाहित असल्याने त्याला जोरदार धक्का लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोंढाळी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)***