आपला आयकर विभागाची नोटीस
By Admin | Updated: February 11, 2015 12:19 IST2015-02-11T12:19:03+5:302015-02-11T12:19:03+5:30
बोगस कंपन्यांकडून निधी स्वीकारल्याप्रकरणी आयकर विभागाने आम आदमी पक्षाला नोटीस बजावली आहे.
आपला आयकर विभागाची नोटीस
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - बोगस कंपन्यांकडून निधी स्वीकारल्याप्रकरणी आयकर विभागाने आम आदमी पक्षाला नोटीस बजावली आहे. पाच दिवसात या नोटीशीवर उत्तर न दिल्यास १० हजार रुपयांचा दंड आकारु असा इशाराच आयकर विभागाने दिल्याने आम आदमी पक्षाची डोकेदुखी वाढली आहे.
दिल्लीत दिमाखदार विजय मिळवणा-या आम आदमी पक्षात सध्या जल्लोषाचे वातावरण असून पक्षाचे नेते व कार्यकर्ते १४ फेब्रुवारी रोजी होणा-या शपथविधी सोहळ्याच्या तयारीला लागले आहेत. विजयाचा गुलाल उतरलेला नसतानाच आप आता आयकर विभागाच्या कचाट्यात सापडला आहे. निवडणुकीदरम्यान आवाम या स्वयंसेवी संस्थेने आम आदमी पक्षाने मध्यरात्री बोगस कंपन्यांकडून दोन कोटी रुपयांचा निधी स्वीकारल्याचा आरोप केला होता. आयकर विभागाने याच प्रकरणावरुन आपला नोटीस धाडली आहे. आयकर विभागाने आपकडून स्पष्टीकरण मागितले आहे. आपने काहीच गैर केले नसून आम्ही आयकर व अर्थमंत्रालयाला चौकशीत सहकार्य करु अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आशुतोष यांनी दिली आहे.