शाझिया इल्मींचा आपला अलविदा

By Admin | Updated: May 24, 2014 15:05 IST2014-05-24T14:06:37+5:302014-05-24T15:05:22+5:30

आम आदमी पार्टीच्या स्थापनेपासून असलेल्या शाझिया इल्मी यांनी पक्षाचा व सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

Your goodbye to Shazia Ilmicha | शाझिया इल्मींचा आपला अलविदा

शाझिया इल्मींचा आपला अलविदा

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. २४ - आम आदमी पार्टीच्या स्थापनेपासून असलेल्या शाझिया इल्मी यांनी पक्षाचा व सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. पक्षामध्ये अंतर्गत लोकशाहीचा अभाव असल्याचे सांंगताना केजरीवाल व मूठभर लोकांच्या हातात सगळे अधिकार सामावल्याची टीका त्यांनी केली.

पक्षामध्ये लोकशाही व स्वराज्य दोघांचा अभाव असल्याचे सांगताना खूप चांगलं काम करता आलं असतं, परंतप ही संधी पार्टीने गमावल्याची टीका इल्मी यांनी केली आहे. पक्षामध्ये चांगल्या प्रशासनाचा अभाव असून मी चांगलं करीअर सोडून इथं आले, परंतु मला संपूर्णपणे बाजुला सारण्यात आल्याची टीकाही त्यांनी केली. मी कुठल्याही अन्य पक्षात जाणार नाही, तर पक्षानं सुधारावं या उद्देशाने राजीनामा दिला असल्याचे त्या म्हणाल्या.

अनेक वर्षे टिव्ही चॅनेल्समध्ये काम केलेल्या शाझिया हा पक्षाचा ओळखीचा चेहरा होता. प्रसारमाध्यमांमध्ये सहज वावर असलेल्या इल्मींच्या राजीनाम्यामुळे आपला धक्का बसणार आहे. याआधीही अनेक बड्या व्यक्तिंनी आधी आपला पाठिंबा दिल्यानंतर पश्चात्तापाची भावना व्यक्त करत पार्टीला राम राम केला होता. इल्मींच्या राजीनाम्यानंतर आपमध्ये अनेक समस्या असल्याचे व पक्षांतर्गत प्रशासन चांगले नसल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, कॅप्टन गोपीनाथ जे वर्षापूर्वी आम आदमी पार्टीत दाखल झाले होते, त्यांनीही पक्षाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.

इल्मी यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना पक्षाचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव म्हणाले की, इल्मी यांनी त्यांची नाराजी अनेकवेळा व्यक्त केली होती. निवडणुकांनंतर पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांच्या मुद्यांचा विचार करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले होते. इल्मी यांची अनुपस्थिती पक्षाला जाणवेल असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Your goodbye to Shazia Ilmicha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.