शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

आपची बेदींविरुद्ध तक्रार

By admin | Updated: February 8, 2015 02:24 IST

विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाचा आरोप करून भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्याविरुद्ध शनिवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली.

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीने कृष्णानगरस्थित विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाचा आरोप करून भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्याविरुद्ध शनिवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. आयोगाला पाठविलेल्या पत्रात आपने किरण बेदी यांनी आज सकाळी शेकडो कार्यकर्त्यांसह दुचाकीवर रॅली काढल्याचा आरोप केला आहे. रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांकडे प्रचाराचे साहित्य होते आणि ते मतदारांशी बोलले, असेही त्यांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा ५ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता थंडावल्या होत्या. स्थिर सरकारची आशाया निवडणुकीनंतर राजधानीत स्थिर सरकार स्थापन होईल, अशी आशा दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी व्यक्त केली आहे. गेल्या एक वर्षापासून दिल्लीत राष्ट्रपती राजवट आहे. निवडणुकीनंतर दिल्लीत स्थिर सरकार स्थापन होणार काय? असा प्रश्न विचारला असता मला अशी आशा आहे, असे ते म्हणाले. जंग यांनी मॉडेल टाऊन मतदार संघातील सिव्हिल लाईन्समध्ये सेंट झेव्हिअर्स सिनिअर सेंकडरी स्कूल मतदान केंद्रात मतदान केले. राष्ट्रपतींचे मतदान नाहीराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानात भाग घेतला नाही. पण राष्ट्रपती भवनातील मतदान केंद्रावर जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा मात्र घेतला. देशाचा राष्ट्रपती हा कुठल्याही एका राजकीय पक्षाचा नसतो. त्यामुळे आपण सार्वत्रिक अथवा विधानसभा निवडणुकीत मतदान करणार नाही, असे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)४दिल्ली विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या देखरेख पथकाने ४० लाख रुपये रोख आणि १ कोटी २६ लाख रुपये किमतीच्या मद्याच्या ५३,००० बाटल्या जप्त केल्या. याशिवाय आयोगाच्या चमूने मतदारांना बेकायदेशीरपणे लालूच दिल्याप्रकरणी ४४ गुन्ह्यांचीही नोंद केली. पेड न्यूजचीही ६० प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत.मतदानावर बहिष्कार४आपल्या क्षेत्रात कुठल्याही प्रकारचे विकास कार्य न झाल्याने नाराज झालेल्या नरेला मतदारसंघातील झंगोला गावामध्ये बहुतांश नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घातला. ४अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार दुपारी १२.३० वाजेपर्यत या क्षेत्रातील एकूण नोंदणीकृत १,८०० मतदारांपैकी फक्त १९ मतदारांनीच आपला मतदानाचा हक्क बजावला. नाराज मतदारांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते.