युनिस खान

By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:02+5:302015-01-22T00:07:02+5:30

विश्वचषकानंतर युनिसची वन डेतून निवृत्ती

Younis Khan | युनिस खान

युनिस खान

श्वचषकानंतर युनिसची वन डेतून निवृत्ती
कराची : पाकिस्तान संघाचा अनुभवी फलंदाज युनिस खान हा विश्वचषकानंतर वन डे क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचे संकेत विश्वसनीय सूत्रांनी दिले. याचा अर्थ असा की आगामी विश्वचषकानंतर पाक संघ मिस्बाह उल हक, शहीद आफ्रिदी आणि युनिस खान यांच्या सेवेस मुकणार आहे.
युनिस विश्वचषकात खेळण्यास कमालीचा उत्सुक असल्याची माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली. वन डे क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा त्याचा निर्धार कायम आहे. युवा खेळाडूंना संधी मिळावी यासाठी आपण विश्वचषकानंतर संघातील स्थान रिकामे करणार असल्याचे युनिसच्यावतीने या सूत्रांनी स्पष्ट केले.
काही दिवसांआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध युनिसला निवडकर्त्यांनी वन डे संघात स्थान दिले नव्हते. पण त्याने स्वत:चा खेळ सुधारून पुनरागमन केले. विश्वचषक आटोपताच केवळ कसोटी खेळत राहायचे असे युनिसला वाटत आहे. कर्णधार मिस्बाह आणि अष्टपैलू आफ्रिदी यांनी विश्वचषकानंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची आधीच घोषणा केली आहे.
युनिसने पाककडून ९६ कसोटी आणि २५९ वन डे खेळले. त्याच्या कसोटीत ५३.३७ तसेच वन डेत ३१.७५ च्या सरासरीने धावा आहेत.(वृत्तसंस्था)

Web Title: Younis Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.