एव्हरेस्टवर पाऊल टाकणारे सगळ्यात छोटे बहीण-भाऊ
By Admin | Updated: August 12, 2015 08:49 IST2015-08-12T04:41:55+5:302015-08-12T08:49:33+5:30
कंदर्प शर्मा (५ वर्षे १० महिने) आणि त्याची बहीण ऋत्विका शर्मा (८ वर्षे ११ महिने) या भावंडांच्या नावाने जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट चढून जाणारे सगळ्यात छोटे गिर्यारोहक

एव्हरेस्टवर पाऊल टाकणारे सगळ्यात छोटे बहीण-भाऊ
काठमांडू : कंदर्प शर्मा (५ वर्षे १० महिने) आणि त्याची बहीण ऋत्विका शर्मा (८ वर्षे ११ महिने) या भावंडांच्या नावाने जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट चढून जाणारे सगळ्यात छोटे गिर्यारोहक असा नवा विक्रम नोंदला जाईल, असे दिसते.
नेपाळच्या उत्तरपूर्वेकडील ५,३८० मीटर उंचीवरील एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर हे दोघे सोमवारी यशस्वीपणे परतले. या मुलांसोबत बेस कॅम्पवर त्यांचे पालकही होते. बेस कॅम्पवर वैयक्तिक पातळीवर यशस्वीपणे परतणारे वयाने सगळ्यात तरुण भाऊ व बहीण म्हणूनही त्यांच्या नावावर विक्रम नोंदला गेला आहे. हे शर्मा कुटुंब ८,८४८ मीटर उंचीच्या एव्हरेस्टच्या बेस कॅ म्पवर पोहोचणारे पहिले कुटुंब ठरले आहे.