शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या मदतीला आलेल्या युवकाला नवऱ्याने भोसकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 12:20 IST

भररस्त्यात महिलेवर अन्याय, अत्याचार होत असताना अनेकजण फक्त बघ्याची भूमिका घेतात. त्यामुळे गुन्हा करणाऱ्याची हिम्मत वाढते.

ठळक मुद्देललितने मध्येहस्तक्षेप करुन तिच्या नवऱ्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मोहम्मद इख्तियारने  माझ्याकडे काहीवेळासाठी पाहिले व पुन्हा पत्नीला शिवीगाळ सुरु केली.

नवी दिल्ली - भररस्त्यात महिलेवर अन्याय, अत्याचार होत असताना अनेकजण फक्त बघ्याची भूमिका घेतात. त्यामुळे गुन्हा करणाऱ्याची हिम्मत वाढते. दिल्लीमध्येही भरस्त्यात असाच प्रकार सुरु असताना मदतीसाठी पुढे आलेल्या युवकाला भोसकण्यात आले. पश्चिम दिल्लीच्या इंदरपुरीमध्ये शनिवारी ही धक्कादायक घटना घडली. ललित (20) असे जखमी युवकाचे नाव असून तो आपल्या कारने जात असताना त्याला एका महिलेच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. ही महिला मदतीसाठी याचना करत होती. ललितने लगेच आपली कार त्या महिलेच्या दिशेने वळवली. 

त्या महिलेला तिचा पती मोहम्मद इख्तियार मारहाण करत होता. ललितने हस्तक्षेप करुन तिच्या नवऱ्याला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावर संतापलेल्या महिलेच्या पतीने ललितला खेचून त्याच्या गाडीच्या बाहेर काढले व त्याला भोसकले. या हल्ल्यात ललितच्या मानेला आणि हाताला मार लागला आहे. स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ललितला जवळच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेण्यात आले. उपचारानंतर त्याला रात्री घरी सोडण्यात आले. 

मी माझी गाडी पार्क करण्यासाठी जात होतो. त्यावेळी एक व्यक्ती महिलेवर ओरडत असल्याचे मी पाहिले. त्याच्या हातात चाकू होता. मी लगेच माझी कार त्या दिशेने वळवली. रस्त्याच्या मधोमध त्यांच्यामध्ये वाद सुरु होता. यावेळी अनेकजण फक्त बघ्याच्या भूमिकेमध्ये होते. तो पुरुष महिलेवर हल्ला करेल अशी स्थिती होती. त्यामुळे महिलेला वाचवण्यासाठी म्हणून मी हस्तक्षेप केला असे ललितने सांगितले.  

मोहम्मद इख्तियारने  माझ्याकडे काहीवेळासाठी पाहिले व पुन्हा पत्नीला शिवीगाळ सुरु केली. ललितने पुन्हा हस्तक्षेप करुन रोखले व गाडी पुढे नेली. त्यावेळी इख्तियारने ललितला गाडी बाहेर पडण्यास सांगितले. आरोपीने ललितच्या कॉलरला पकडून गाडी बाहेर खेचले व त्याच्यावर वार केले. दोघांमध्ये संघर्ष सुरु असताना  ललितने त्याच्या हातातला चाकू पकडून ठेवला. त्यामुळे हाताचे तळवे रक्तबंबाळ झाले. रक्त पाहिल्यानंतर इख्तियार घाबरला व तिथून पळून गेला.

टॅग्स :Crimeगुन्हा