शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

अजब प्रेम की गजब कहाणी! तरूणानं चालत्या रेल्वेतच टॉयलेटसमोर केलं विवाहित महिलेशी लग्न, पाहा Photo

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 09:20 IST

बिहारमध्ये एका तरुणाने आधीच विवाहित असलेल्या महिलेशी चालत्या रेल्वेतच टॉयलेटसमोर लग्न केले आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, संबंधित महिलेचे नाव अनु कुमारी, तर तरुणाचे नाव आशु कुमार असे आहे. (young man married a married woman in front of the toilet in a moving train)

ठळक मुद्देबिहारमध्ये एका तरुणाने आधीच विवाहित असलेल्या महिलेशी चालत्या रेल्वेतच टॉयलेटसमोर लग्न केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे.लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी सासुरवाडीतून पळून गेली होती मुलगी.

 पाटणा - आपण यापूर्वी लग्नासंदर्भात अनेक अनोखे किस्से ऐकले अथवा वाचले असतील, पण आज आम्ही आपल्याला जो किस्सा सांगत आहोत, असा किस्सा आपण यापूर्वी क्वचितच ऐकला किंवा वाचला असेल. समोर आलेल्या वृत्तानुसार, बिहारमधील एका प्रेमी जोडप्याने अगदी अनोख्या अंदाजात चालत्या रेल्वेतलग्न केले आहे. (young man married a married woman in front of the toilet in a moving train in Bihar pictures went viral)

बिहारमध्ये एका तरुणाने आधीच विवाहित असलेल्या महिलेशी चालत्या रेल्वेतच टॉयलेटसमोर लग्न केले आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, संबंधित महिलेचे नाव अनु कुमारी, तर तरुणाचे नाव आशु कुमार असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. मात्र, मुलीकडच्यांचा या लग्नाला विरोध होता. यामुळे त्यांनी त्यांच्या मुलीचे लग्न किरणपूर गावातील एका तरुणाशी करून दिले होते.

लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी सासुरवाडीतून पळून गेली होती मुलगी -मात्र, संबंधित मुलीने त्या तरुणाला पती मानण्यास नकार दिला आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी ती ससुरवाडी सोडून पळून गेली. सांगण्यात येते, की सासूरवाडी सोडल्यानंतर संबंधित मुलगी आपल्या प्रियकराला भेटली आणि तिने पतीला सोडत प्रियकरासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.

चालत्या रेल्वेत टॉयलेट समोरच लग्न -मिळालेल्या माहितीनुसार, हे जोडपे सुल्लतानगंज रेल्वे स्थानकावर पोहोचले आणि बेंगळुरूकडे जाणाऱ्या रेल्वेत चढले. यानंतर या दोघांनी कसल्याही प्रकारचा वेळ न दवडता रेल्वेतील टॉयलेटसमोर लग्न उरकले. या अनोख्या लग्नाचे फोटो आता सोशल मेडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत.

लग्नानंतर आशु कुमारने सांगितले, की गावातील अनु कुमारी आणि आपले प्रेम होते. यासंदर्भात तिच्या कुटुंबीयांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिला घराबाहेर निघण्यास विरोध केला. यानंतर एप्रिल महिन्यात त्यांनी किरणपूर गावातील एका तरुणाशी तिचे लग्न लावले होते. 

टॅग्स :marriageलग्नBiharबिहारrailwayरेल्वे