उत्तर प्रदेशमध्ये एक अजब घटना पाहायला मिळाली आहे. गर्लफ्रेंड भेटायला आली नाही म्हणून बॉयफ्रेंड चिडला आणि थेट टॉवरवर चढला. हे दृश्य पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमली आणि काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, आकाश असं या तरुणाचं आहे, जो हरदोईचा रहिवासी आहे.
आकाश त्याच्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी आला होता. मात्र मुलीच्या कुटुंबाने त्याला भेटू दिलं नाही. त्यामुळे संतापलेला आकाश एका उंच टॉवरवर चढला. त्याने खाली येण्यास स्पष्ट नकार दिला आणि त्याच्या गर्लफ्रेंडला बोलावण्याची मागणी करत राहिला. आकाशच्या या कृतीमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. हे दृश्य पाहण्यासाठी लोक जमले. लवकरच मोठी गर्दी जमली.
पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचलं आणि आकाशला समजावण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु आकाश ठाम राहिला आणि त्याने वारंवार आपल्या गर्लफ्रेंडशीच लग्न करायचं आहे, तिला भेटायचं आहे असा आग्रह धरला. मुलीच्या कुटुंबीयांचा या नात्याला विरोध आहे. म्हणून ते दोघांना भेटू देत नाहीत.
पोलीस आकाशशी बोलले, त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि खूप प्रयत्नांनंतर अखेर त्याला खाली आणलं. या घटनेचे अनेक व्हिडीओ आणि फोटो जोरदार व्हायरल होत आहे. तसेच सोशल मीडियावरही याचीच चर्चा रंगली आहे. लोक यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक याला वेडेपणा आणि मूर्खपणा म्हणत आहेत.