शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी ५८ टक्के मतदान; १२६ जागांवरील ६९२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद
3
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
4
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
5
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
6
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
7
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
8
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
9
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
10
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
11
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
12
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
13
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
14
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
15
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
16
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
17
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
18
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
19
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
20
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
Daily Top 2Weekly Top 5

तरुण पिढी अमली पदार्थांच्या आहारी जाणे चिंताजनक : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 12:41 IST

महाराष्ट्रातील शाळा-महाविद्यालयांमध्ये लोकमत 'नो ड्रग्ज' मोहीम राबवून करणार जागृती, लोकमत पार्लमेंटरी अवॉर्ड सोहळ्यासाठी उपराष्ट्रपतींनी दिली १८ डिसेंबरची तात्पुरती तारीख

नवी दिल्ली : देशातील तरुण पिढी अमली पदार्थांच्या आहारी जात असून, त्यांना ड्रग्जच्या मगरमिठीतून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे मत देशाचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले आहे.

'लोकमत एडिटोरियल बोर्डा'चे चेअरमन आणि राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी गुरुवारी उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांची निवासस्थानी भेट घेऊन लोकमत पार्लमेंटरी पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रण दिले. उपराष्ट्रपतींनी यासाठी तात्पुरती १८ डिसेंबरची तारीख दिली आहे. डॉ. दर्डा यांनी यावेळी सेवाग्राम येथे विणलेली शाल उपराष्ट्रपतींना भेट दिली.

यावेळी राधाकृष्णन म्हणाले की, आपले मराठी भाषेवर विशेष प्रेम आहे. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगायला हवा. साध्या राहणीमानाला आता कमजोरी समजली जाते, याबाबत त्यांनी खंत सुद्धा व्यक्त केली.

चार श्रेणींमध्ये लोकमत पार्लमेंटेरियन अवॉर्ड

लोकमत पार्लमेंटेरियन अवॉर्डसाठी लोकसभा व राज्यसभेतील प्रत्येकी चार-चार खासदारांची निवड केली जाते. हा अवॉर्ड 'लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड', 'बेस्ट पार्लमेंटेरियन ऑफ द इयर', 'बेस्ट वुमन पार्लमेंटेरियन ऑफ द इयर' व 'बेस्ट डेब्युटंट पार्लमेंटेरियन ऑफ द इयर' अशा ४ श्रेणींत दिला जातो.

लोकमत समूहाचा जनजागृतीसाठी पुढाकार अत्यंत महत्त्वाचा

उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी यावेळी तरुण पिढीमध्ये अमली पदार्थांचे व्यसन वाढत चालले असल्याच्या मुद्द्यावर गंभीर चिंता व्यक्त केली.

तरुणांना ड्रग्जपासून परावृत्त करण्यासाठी बिग बी अमिताभ बच्चन, रजनीकांत आणि चिरंजीवी यांच्यासारख्या चित्रसृष्टीतील दिग्गज कलावंतांना सोबत घेऊन मोहीम राबविण्याची गरज आहे.

पैसा भारताविरुद्ध दहशतवादी

ड्रग्जचा व्यापार फोफावत आहे आणि हा कारवायांसाठी वापरला जातो, हे जास्त चिंताजनक असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले. महाराष्ट्र, गोवा व दिल्लीत सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या लोकमत वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकमत समूहानेदेखील 'नो ड्रग्ज'बाबत जनजागृतीसाठी पुढाकार घ्यायला हवा, असा सल्ला उपराष्ट्रपतींनी दिला.

तेव्हा, हा विषय आमच्याही जिव्हाळ्याचा असल्याचे सांगून डॉ. विजय दर्डा यांनी महाराष्ट्रातील शाळा व सर्व महाविद्यालयांमध्ये 'नो ड्रग्ज' मोहीम राबविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन उपराष्ट्रपतींना दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Youth falling prey to drugs alarming: Vice President C. P. Radhakrishnan

Web Summary : Vice President Radhakrishnan expressed concern over youth's drug addiction, emphasizing the need for comprehensive efforts. He urged Lokmat to raise awareness and suggested involving celebrities in anti-drug campaigns. Dr. Darda assured him of initiating 'No Drugs' campaigns in Maharashtra schools and colleges.
टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डाlokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड