शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही लोकसभेत नोकरी करता", चिमुकलीचं उत्तर ऐकून मोदींसह सर्वच हसायला लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 20:46 IST

उज्जैनचे खासदार अनिल फिरोजिया आणि त्यांच्या कुटुंबीयांची संसद भवनात PM मोदींची भेट घेतली. या भेटीत पीएम मोदींनी फिरोजियांच्या 5 वर्षीय चिमुकलीशी खास बातचित केली.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा लहान मुलांना भेटतात, त्यांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या भेटीदरम्यान अनेकदा मजेशीर किस्से घडतात. असाच एक किस्सा संसद भवनातील भैटीदरम्यान घडला. एका 5 वर्षीय मुलीने पंतप्रधान मोदींना दिलेले उत्तर चर्चेचा विषय ठरत आहे. नरेंद्र मोदींनी मध्य प्रदेशातील उज्जैनचे खासदार अनिल फिरोजिया आणि त्यांच्या कुटुंबीयांची संसद भवनात भेट घेतली. या भेटीत पीएम मोदींनी फिरोजियांच्या 5 वर्षीय चिमुकलीशी खास बातचित केली. या संवादादरम्यान पीएम मोदींनी चिमुकल्या अहानाला विचारले की, 'ती त्यांना ओळखते का? यावर अहानाने उत्तर दिले, होय. तुम्ही मोदी आहात. तुम्ही रोज टीव्हीवर येता. यावर पंतप्रधानांनी अहानाला विचारले की, मी काय करतो हे तिला माहीत आहे का? त्यावर अहाना म्हणाली, हो. तुम्ही लोकसभेत काम करता.' यावेळी चिमुकल्या अहानाचे उत्तर ऐकून पीएम मोदींसह उपस्थित सर्व लोक हसायला लागले. यानंतर पीएम मोदींनी अहानाला चॉकलेट दिले. तसेच, मोदींनी अनिल फिरोजिया यांचे वजन कमी केल्याबद्दल कौतुकही केले.कोण आहेत अनिल फिरोजिया?अनिल फिरोजिया हे भाजपचे तेच खासदार आहेत, ज्यांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी 24 फेब्रुवारी रोजी उज्जैनला आले होते. विकासकामांच्या घोषणांमध्ये त्यांनी आरोग्याबाबतही सल्ला देत खासदार अनिल फिरोजिया यांना आव्हान दिले. गडकरी म्हणाले होते की, फिरोजिया यांनी वजन कमी करावे, प्रत्येक किलोग्रॅममागे त्यांच्या भागाला एक हजार कोटींचा निधी दिला जाईल. गडकरींच्या या विधानानंतर फिरोजियांनी आतापर्यंत 21 किलो वजन कमी केले आहे, म्हणजेच त्यांनी आपल्या क्षेत्रासाठी 21 हजार कोटी रुपये निश्चित केले आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाMember of parliamentखासदारlok sabhaलोकसभा