शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 15:20 IST

आपल्या कमाईच्या स्रोतांसंदर्भात स्पष्टीकरण देताना प्रशांत किशोर म्हणाले, “काही 'छुटभैया' नेत्यांनी आमच्या कमाईवर प्रश्न उपस्थित केले आहे. यामुळे प्रथम मी बिहारच्या जनतेला याचे उत्तर देतो...

जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी, त्यांच्या तीन वर्षांच्या कमाईसंदर्भात आणि पक्षाला मिळणाऱ्या निधीच्या स्रोतांसंदर्भात खुलासा केला आहे. तत्पूर्वी, बिहारमधील भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार संजय जायसवाल यांनी किशोर आणि जन सुराज पक्षाच्या निधीच्या स्रोतांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना, गेल्या तीन वर्षांत सल्लागार म्हणून आपण २४१ कोटी रुपये कमावले. यांपैकी ९८.७५ कोटी रुपये आपण स्वत:च्या खात्यातून जन सुराज पक्षाला डोनेट केले आहेत, असे किशोर यांनी म्हटले आहे. ते सोमवारी पाटणा येथे पत्रकारपरिषदेत बोलत होते. 

बिहारच्या चोर नेत्यांना सर्व चोरच वाटतात - आपल्या कमाईच्या स्रोतांसंदर्भात स्पष्टीकरण देताना प्रशांत किशोर म्हणाले, “काही 'छुटभैया' नेत्यांनी आमच्या कमाईवर प्रश्न उपस्थित केले आहे. यामुळे प्रथम मी बिहारच्या जनतेला याचे उत्तर देतो. प्रशांत किशोर व्यंगात्मक स्वरात म्हटले, ज्याप्रमाणे श्रावनाच्या आंधळ्याला सर्व काही हिरवेच दिसते, त्याचप्रमाणे बिहारच्या चोर नेत्यांना सर्व चोरच वाटतात.”

पैसा सरस्वतीने येतो, आम्ही ज्यांना सल्ला देतो, मग ते... -पुढे सविस्तर खुलासा देत प्रशांत किशोर म्हणाले, “पैसा सरस्वतीने येतो. आम्ही ज्यांना सल्ला देतो, मग ते व्यक्ती असो वा कंपनी, त्यांच्याकडून फीस घेतो. २०२१-२२ पासून तीन वर्षांत माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांच्या खात्यात २४१ कोटी रुपये फी म्हणून आले आहेत. यावर ३०.९५ कोटी जीएसटी आणि २० कोटी आयकर भरला आहे. तसेच, उरलेल्या रकमेतून ९८.७५ कोटी रुपये जन सुराज पक्षाला डोनेट केले आहेत.” 

English
हिंदी सारांश
Web Title : Prashant Kishor's Income Revealed, Donated ₹98 Crore to Jan Suraj

Web Summary : Prashant Kishor disclosed ₹241 crore earnings as a consultant over three years. He clarified that ₹98.75 crore was donated to Jan Suraj party from his own account, responding to allegations about funding sources.
टॅग्स :BiharबिहारElectionनिवडणूक 2024Prashant Kishoreप्रशांत किशोरBJPभाजपा