प्रवक्तेपदावरून आपने अलका लांबांना हटविले

By Admin | Updated: June 17, 2016 02:48 IST2016-06-17T02:48:09+5:302016-06-17T02:48:09+5:30

आम आदमी पार्टीने पक्षाच्या आमदार अलका लांबा यांना पक्षप्रवक्ते पदावरून हटविले आहे. दिल्लीचे परिवहनमंत्री गोपाल राय यांचा पदभार काढून घेतल्यासंबंधीची माहिती

You removed the ala laksa from the spokesperson | प्रवक्तेपदावरून आपने अलका लांबांना हटविले

प्रवक्तेपदावरून आपने अलका लांबांना हटविले

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीने पक्षाच्या आमदार अलका लांबा यांना पक्षप्रवक्ते पदावरून हटविले आहे.
दिल्लीचे परिवहनमंत्री गोपाल राय यांचा पदभार काढून घेतल्यासंबंधीची माहिती देताना लांबा पक्ष धोरणापासून ढळल्यामुळे त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते, असे सूत्रांकडून समजले. आपने मात्र, हा पक्षांतर्गत विषय असल्याचे सांगून त्याबाबत भाष्य करण्यास नकार दिला.
भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला (एसीबी) आप सरकारच्या बस योजनेची मुक्त व निष्पक्ष चौकशी करता यावी, यासाठी राय यांचे खाते काढून घेण्यात आल्याचे म्हटल्याने लांबा अडचणीत आल्या होत्या. राय यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून, प्रकृतीच्या कारणामुळे पदभार सांभाळू शकत नसल्याचे त्यांनी कळविले होते. त्यांच्या विनंतीवरून त्यांचा पदभार काढून घेतल्याचे आपने सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: You removed the ala laksa from the spokesperson