शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही १० मिनिटांत ट्रेनमध्ये जागेवर पोहोचा, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 08:02 IST

तर दुसऱ्या प्रवाशाला दिले जाणार तिकीट

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ट्रेन सुटल्यानंतर दहा मिनिटांपर्यंत प्रवासी सीटवर पोहोचला नाही तर तो आता विनातिकीट असेल. त्याची जागा दुसऱ्या प्रवाशाला दिली जाईल. आता टीटीई कर्मचारी एक-दोन स्थानकांपर्यंत प्रवाशांची वाट पाहणार नाहीत. रेल्वे बोर्डाने प्रवाशांना त्यांच्या जागेवर पोहोचण्यासाठी १० मिनिटांचा कालावधी निश्चित करणारा आदेश जारी केला आहे.

रेल्वेच्या आरक्षित डब्यातून प्रवास करणारे प्रवासी घाईमुळे किंवा सोयीमुळे काही वेळा इतर डब्यांमध्ये चढतात. एक-दोन स्थानकांनंतर ते सीटवर पोहोचतात. मात्र, आता असे होणार नाही. रेल्वेने बहुतांश गाड्यांमधील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना हँड हेल्ड टर्मिनल (एचएचटी) मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये ते प्रवाशांची ऑनलाइन उपस्थिती नोंदवतात.आता टीटीईला १० मिनिटांत माहिती अपडेट करावी लागेल. जर प्रवासी सीटवर पोहोचला नाही, तर ती सीट आरएसी किंवा प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट असलेल्या प्रवाशाला उपलब्ध करून दिली जाईल. प्रवाशांनी आपल्या सीटवर वेळेत जाण्यासाठी ज्या बोगीत आपली सीट आहे तेथे उभे राहणे आवश्यक झाले आहे.

यापूर्वी काय होते? एका टीटीईने सांगितले की, मशीन येण्यापूर्वी मॅन्युअल चार्ट तयार करण्यात येत असे. यात १५ मिनिटे किंवा स्टेशन सोडेपर्यंत वाट पाहिली जात होती. आता केवळ १० मिनिटे देण्यात येत आहेत. मात्र, गर्दी असल्यास टीटीई कर्मचाऱ्यांना प्रवाशापर्यंत पोहोचण्यास अधिक वेळ लागू शकतो.

नव्या प्रणालीअंतर्गत आता प्रवाशांना ज्या स्थानकावरून प्रवासाचे तिकीट आहे, त्याच स्टेशनवर ट्रेनमध्ये चढावे लागेल. बोर्डिंग स्टेशनवर प्रवासी न मिळाल्यास अनुपस्थित म्हणून नोंद केली जाईल.  त्यात कोणताही बदल होणार नाही, कारण संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. - रघुवीर सिंग शेखावत, सरचिटणीस, रेल्वे तिकीट तपासणी कर्मचारी संघटना.

टॅग्स :railwayरेल्वेIRCTCआयआरसीटीसी