आप हिरो, मोदी झिरो - अरविंद केजरीवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2016 11:48 IST2016-06-18T11:42:06+5:302016-06-18T11:48:37+5:30

मोदी सरकारला २ वर्ष तर आप सरकारला दीड वर्ष पूर्ण झाली, तरी जनतेच्या नजरेत 'मोदी झिरो आप हिरो' आहे' असे ट्विट करत केजरीवाल यांनी मोदींवर निशाणा साधला.

You Hero, Modi Zero - Arvind Kejriwal | आप हिरो, मोदी झिरो - अरविंद केजरीवाल

आप हिरो, मोदी झिरो - अरविंद केजरीवाल

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.१८ - आम आदमी पक्षाला दिल्लीत सत्तेवर येऊन दीड वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. ' मोदी सरकारला २ वर्ष तर आप सरकारला दीड वर्ष पूर्ण झाली, तरी जनतेच्या नजरेत 'मोदी झिरो आप हिरो' आहे' असे ट्विट करत केजरीवाल यांनी मोदींवर निशाणा साधला.
तसेच प्रदर्शनापूर्वीच सेन्सॉर बोर्डाशी झालेल्या वादामुळे चर्चेत आलेल्या 'उडता पंजाब‘ चित्रपटाबाबतही केजरीवाल यांनी ट्‌विटरवरून प्रतिक्रिया व्यक्त करत पंजाब सरकारवर टीका केली आहे. 'उडता पंजाब पाहिला. चित्रपटातून राजकीय व्यक्ती अमली पदार्थांचे रॅकेट चालवताना दिसत आहे, निवडणुकीदरम्यान अमली पदार्थ वितरित केले जातात. पंजाबची परिस्थिती फारच वाईट आहे'  अशा शब्दांत त्यांनी पंजाब सरकावर टीका केली आहे. तसेच पंजाबची काय स्थिती झाली आहे पाहण्यासाठी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी हा चित्रपट जरूर पाहावा, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला आहे.

Web Title: You Hero, Modi Zero - Arvind Kejriwal