शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Election 2020 : केजरीवाल दहशतवादी, आमच्याकडे अनेक पुरावे, जावडेकरांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 17:59 IST

Delhi Election 2020 : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.

ठळक मुद्दे मोदींनीही प्रचारसभेत केजरीवाल आणि आम आदमी पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. केजरीवाल केविलवाणा चेहरा करून मी काय आतंकवादी आहे का, असा प्रश्न विचारत आहेत. केजरीवाल दहशतवादी असल्याचे अनेक पुरावे आहेत. मी अराजकवादी आहे, असं केजरीवालांनी स्वतः सांगितलं आहे.

नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपानंही आता मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदींना उतरवलं आहे. मोदींनीही प्रचारसभेत केजरीवाल आणि आम आदमी पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शाहीन बागमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे आम आदमी पार्टी आणि भाजपा आमने-सामने आलेले आहेत. त्यातच भाजपा या आंदोलनाचा राजकीय दृष्टिकोनातून फायदा उचलत असल्याचा आरोप आपच्या अरविंद केजरीवालांनी केला आहे. तर भाजपाचे नेते मनोज तिवारी आणि खासदार परवेश वर्मा हे शाहीन बाग आंदोलनावरून आम आदमी पार्टीवर पलटवार करत आहेत. त्याच दरम्यान आता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केजरीवालांवर घणाघाती टीका केली आहे.दिल्लीतली जनता त्यांच्या बाजूनं उभी होती, तिनंसुद्धा आता त्यांच्याकडे पाठ फिरवलेली आहे. त्याचंही एक कारण आहे. त्यामुळे केजरीवाल केविलवाणा चेहरा करून मी काय आतंकवादी आहे का, असा प्रश्न विचारत आहेत. पण केजरीवाल दहशतवादी असल्याचे अनेक पुरावे आहेत. मी अराजकवादी आहे, असं केजरीवालांनी स्वतः सांगितलं आहे. अराजकवादी आणि दहशतवाद्यांमध्ये जास्त फरक नसतो, असं म्हणत जावडेकरांनी केजरीवालांवर टीकास्त्र सोडलं आहे. देशभरात नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून निषेध मोर्चे आणि आंदोलनं काढली जात आहेत. त्यातच शाहीन बागमधल्या आंदोलनात एका तरुणानं गोळीबार केल्यानं हे प्रकरण चांगलेच तापले होते. भाजपानंही या मुद्द्यावर आम आदमी पार्टीला घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. त्यामुळे दिल्ली विधानसभेत शाहीन बागचा मुद्दा गाजतोय. दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत आपनं 70 पैकी 67 जागांवर विजय मिळवला होता. भाजपला तीन जागांवर यश मिळाले तर काँग्रेसला खातंही उघडता आले नव्हते.  

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhi electionदिल्ली निवडणूकPrakash Javadekarप्रकाश जावडेकरBJPभाजपा