शहरं
Join us  
Trending Stories
1
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
2
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
3
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
4
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
5
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
6
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
7
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
8
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
9
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
10
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
11
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
12
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
13
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
14
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
15
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
16
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
17
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
18
'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून ध्रुव राठी संतापला; थेट ISIS शी केली तुलना, म्हणाला...
19
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
20
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
Daily Top 2Weekly Top 5

लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 05:33 IST

पर्यावरण कार्यकर्ता सोनम वांगचुक यांना रासुकाखाली केलेली अटक चुकीची असून, त्यांच्यासह इतरांची तात्काळ व बिनशर्त सुटका करण्याची मागणी कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सने केली आहे.

लेह : पर्यावरण कार्यकर्ता सोनम वांगचुक यांना रासुकाखाली केलेली अटक चुकीची असून, त्यांच्यासह इतरांची तात्काळ व बिनशर्त सुटका करण्याची मागणी कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सने केली आहे. लडाखला राज्याचा दर्जा आणि इतर महत्त्वाच्या मागण्या न पूर्ण करून केंद्र सरकार लडाखच्या लोकांना ‘परके’ बनवत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स ही लेह अपेक्स बॉडीसोबत राज्याच्या दर्जासाठी आणि इतर घटनात्मक संरक्षणासाठी आंदोलनाचे नेतृत्व करत आहे. त्यांनी लेहमधील हिंसाचारासाठी थेट केंद्रशासित प्रदेश प्रशासनाला जबाबदार धरले असून, हे आंदोलन देशभर पसून शकते असा इशारा दिला आहे. चर्चेसाठी लेह अपेक्स बॉडीने अटी ठेवल्या असून, सतत संवाद साधून तोडगा काढू असे सरकारने म्हटले आहे.

हिंसाचारामुळे असंख्य पर्यटकांकडून बुकिंग रद्द

लडाखमधील हिंसाचारामुळे चालू हंगामात तेथील पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. मोबाईल इंटरनेट सेवाही बंद असून त्यामुळे पर्यटकांचे बुकिंग रद्द होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक पर्यटक हॉटेलमध्येच अडकून पडले आहेत. व्यावसायिकांनी सांगितले की, २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे लडाखमधील पर्यटन व्यवसायालाही फटका बसला.लेहमधील एका हॉटेलचे व्यवस्थापक नसीब सिंग यांनी सांगितले की, पर्यटकांकडून हॉटेलच्या खोल्यांकरिता केलेली आगाऊ बुकिंग रद्द करण्याच्या घटनांत वाढ झाली आहे.  

केंद्र सरकारने लडाख आणि जम्मू-काश्मीर या दोघांचाही विश्वासघात केला आहे. केंद्राने आधी जम्मू-काश्मीरसाठी व आता लडाखसाठी स्वतःच आखलेल्या योजनांचे पालन केले नाही. खोटी आश्वासने देऊन दिशाभूल केली.ओमर अब्दुल्ला, मुख्यमंत्री, जम्मू

कारगिल युद्धातील माजी सैनिक गोळीबारात ठार

लडाखमध्ये सुरक्षा दलांच्या गोळीबारात मरण पावलेल्यांमध्ये कारगिल युद्धातील माजी सैनिक त्सेवांग थारचिन यांचा समावेश असल्याचे समोर आल्यानंतर, काँग्रेसने सोमवारी ही घटना संतापजनक आणि अत्यंत दुःखद असल्याचे म्हटले आहे. त्या पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, त्सेवांग थारचिन हे सियाचीन ग्लेशियरवरही तैनात होते तसेच १९९९च्या कारगिल युद्धात शौर्याने लढले. त्यांचे वडीलही भारतीय लष्करात होते. लडाखसाठी सहावा अनुसूची लागू करण्याच्या मागणीसाठी त्सेवांग शांततामय पद्धतीने आंदोलन करत होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Release Wangchuk, Stop Alienating Ladakh: Kargil Alliance Demands

Web Summary : Kargil Democratic Alliance demands Sonam Wangchuk's release, criticizing the central government for neglecting Ladakh's needs and causing alienation. Protests escalate over statehood, constitutional safeguards, and recent violence impacting tourism. Ex-serviceman killed during protests; Congress condemns the incident.