शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'योगीजी, तुमच्या उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था झोपलीय', प्रियांका गांधी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 09:11 IST

Priyanka Gandhi : एका दलित अल्पवयीन मुलीला दोन तरुणांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे.

नवी दिल्ली : अमेठीमध्ये चोरी केल्याच्या आरोपावरून एका दलित अल्पवयीन मुलीला दोन तरुणांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे.

योगीजी, तुमच्या राज्यात कायदा व सुव्यवस्था झोपलेली दिसते, असे त्या म्हणाल्या आहेत. एका अल्पवयीन मुलीला जमिनीवर पाडून दोन तरुण काठीने मारत आहेत. त्या दोघांच्या शेजारी उभ्या असलेल्या महिलाही या मारहाणीला प्रोत्साहन देत आहेत, असा व्हिडिओ व्हायरल होताच उत्तर प्रदेशात खळबळ उडाली.

त्यावर ट्विटरवर प्रियांका गांधी म्हणाल्या की, हा प्रकार अत्यंत निंदाजनक आहे. उत्तर प्रदेशात रोज दलितांविरुद्ध ३४ आणि महिलांच्या विरोधात १३५ गुन्हे घडतात. या प्रकरणातील आरोपींना २४ तासांच्या आत अटक न केल्यास आम्हाला नाइलाजाने सरकारच्या विरोधात आंदोलन करावे लागेल.

आरोपींचा शोध सुरूपोलिसांनी सांगितले की, आम्ही दोन्ही आरोपींचा शोध घेत आहोत. संबंधित मुलगी व तिच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे आम्ही ॲट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा नोंदवून घेतला आहे. दोन तरुणांनी तिचा लैंगिक छळ केल्याने पोस्कोखालीही गुन्हा नोंदवून घेतला आहे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेश