शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

योगी सरकारचा मोठा निर्णय; इलेक्ट्रिक कार खरेदीवर 1 लाखाची तर बस खरेदीवर 20 लाखांची सूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 15:04 IST

योगी सरकारने EV दुचाकींवर 5 हजार, थ्री-व्हीलरवर 12 हजार आणि कार खरेदीवर 1 लाखाची सूट जाहीर केली आहे. याशिवाय, EVला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत.

कानपूर: देशभरात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून उत्तर प्रदेशच्यायोगी आदित्यनाथ सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरण-2022 ला मंजुरी दिली आहे. सरकारने हे धोरण 3D केले आहे. 3D म्हणजे, या धोरणातून 3 भिन्न उद्दिष्टे साध्य करणे. पहिले म्हणजे, नवीन इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यावर सरकार खरेदीदारांना भरघोस सूट देईल. दुसरे म्हणजे, राज्यात इलेक्ट्रिक वाहने बनवण्यास प्रोत्साहन देणे. आणि तिसरे म्हणजे, चार्जिंग स्टेशन किंवा बॅटरी स्वॅपिंग सेंटर उभारणाऱ्यांना सरकारकडून अनेक सवलती दिल्या जातील.

कारवर 1 लाखांपर्यंत सूटउत्तर प्रदेश सरकारच्या नवीन धोरणानुसार, जर एखाद्या व्यक्तीने यूपीमध्ये नवीन इलेक्ट्रिक वाहन खरेदी केली, तर त्याला मोठ्या प्रमाणात सूट मिळणार आहे. ही सवलत इलेक्ट्रिक टू-व्हीलर ते 3-व्हीलर, कार आणि बसेसवर लागू असेल. राज्यात खरेदी केलेल्या पहिल्या 2 लाख इलेक्ट्रिक दुचाकींवर प्रति वाहन 5,000 रुपयांची सूट मिळणार आहे. तर, सुरुवातीच्या 50,000 इलेक्ट्रिक थ्री-व्हीलरवर प्रति युनिट 12,000 रुपये सूट दिली जाईल. विशेष म्हणजे, पहिल्या 25,000 इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंत सूट मिळेल.

बस खरेदीवर 20 लाख रुपयांची बचत सरकारने इलेक्ट्रिक बस खरेदीवर भरघोस सूट जाहीर केली आहे. राज्यात सुरुवातीच्या 400 इलेक्ट्रिक बस खरेदीसाठी 20 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाईल. योगी सरकारच्या नवीन धोरणानुसार, राज्यात पहिल्या तीन वर्षांत खरेदी केलेल्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांना रोड टॅक्स आणि नोंदणी शुल्क भरावे लागणार नाही. एखाद्या ग्राहकाचे इलेक्ट्रिक वाहन यूपीमध्येच बनवलेले असेल, तर त्याला चौथ्या आणि पाचव्या वर्षातही इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर ही सूट मिळेल.

लॉजिस्टिक वाहनांवरही सबसिडीनवीन धोरणात लॉजिस्टिक किंवा वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवर 10 टक्के सबसिडी देण्याचाही सरकारने प्रस्ताव ठेवला आहे. ही सवलत सुरुवातीच्या 1000 ई-वाहकांसाठी असेल आणि कमाल 1 लाख रुपयांपर्यंत असेल. याशिवाय, राज्यात इलेक्ट्रिक वाहने तसेच ईव्ही बॅटरीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने या धोरणात तरतूद केली आहे. त्यानुसार, राज्यात किमान 1 GW क्षमतेचा बॅटरी उत्पादन प्रकल्प उभारणाऱ्या व्यक्तीला सरकारकडून भांडवली अनुदान दिले जाईल. 1,500 कोटी किंवा त्याहून अधिक गुंतवणूक असलेल्या पहिल्या दोन अल्ट्रा मेगा बॅटरी प्रकल्पांना गुंतवणुकीवर 30 टक्के दराने ही सबसिडी मिळेल.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर