शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मदरशांसाठी योगी सरकार सुरू करणार वेबसाइट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 12:38 IST

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार राज्यातील मदरशांसाठी एक वेगळी वेबसाइट लॉन्च करते आहे.

ठळक मुद्दे उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार राज्यातील मदरशांसाठी एक वेगळी वेबसाइट लॉन्च करते आहे. उत्तरप्रदेशचे अल्पसंख्यांक मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी शुक्रवारी विधानभवनाच्या तिलक हॉलमध्ये या नव्या वेबपोर्टलचं उद्धाटन करणार आहेत.

लखनऊ, दि. 18- उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार राज्यातील मदरशांसाठी एक वेगळी वेबसाइट लॉन्च करते आहे. उत्तरप्रदेशचे अल्पसंख्यांक मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी शुक्रवारी विधानभवनाच्या तिलक हॉलमध्ये या नव्या वेबपोर्टलचं उद्धाटन करणार आहेत.

उत्तर प्रदेशात पहिल्यांदा मदरशांसाठी या पद्धतीचं वेबपोर्टल बनविण्यात आलं आहे. सरकारी अनुदान मिळणाऱ्या राज्यातील एकुण 560 मदरशांना तसंच 10 हजार पेक्षा जास्त मान्यता प्राप्त मदरशांना त्यांची संपूर्ण माहिती या वेबपोर्टलवर द्यावी लागणार आहे. राज्यातील सगळ्या मदरशांना या वेबपोर्टलवर मदरशाची इमारत, वर्गांची माहिती आणि फोटो तसंच शाळेतील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची माहिती द्यावी लागणार आहे. 

आणखी वाचा

लाउडस्पीकर बंदी घालायची असेल तर सर्व धार्मिक स्थळांवर सुद्धा घालावी लागेल - योगी आदित्यनाथ

रस्त्यावर नमाज रोखू शकत नाही तर, पोलीस स्थानकात जन्माष्टमी कशी थांबवू - योगी आदित्यनाथ

 

योगी सरकारने सुरू केलेल्या या नव्या वेबपोर्टलमुळे मदरशांमधील शिक्षण व्यवस्था सुधारायला आणि तेथील व्यवस्था पारदर्शी करायला मदत होइल, असं उत्तर प्रदेश मदरसा काऊन्सिलचं मत आहे. हे नवं वेबपोर्टल सुरू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार, विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती या सगळ्या गोष्टी ऑनलाइन केल्या जाणार आहेत. 

रस्त्यावर नमाज रोखू शकत नाही तर, पोलीस स्थानकात जन्माष्टमी कशी थांबवू - योगी आदित्यनाथईदच्या वेळी रस्त्यावर नमाज अदा करण्यापासून मला रोखता येत नसेल तर, पोलीस स्थानकातही जन्माष्टमी साजरी करण्यापासून मी कोणाला रोखू शकत नाही असं वक्तव्य उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं. आधीच्या समाजवादी पार्टीच्या सरकारला टोला लगावताना स्वत:ला यदुवंशी म्हणवणा-यांनी पोलीस स्थानकात जन्माष्टमी साजरी करण्यावर बंदी घातली होती असे ते म्हणाले.प्रेरणा जनसंचारने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसांबळेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. आपल्या भाषणात आदित्यनाथांनी कावड यात्रेचाही संदर्भ दिला. अधिका-यांनी जेव्हा मला कावड यात्रेमध्ये माईक, डीजे आणि म्युझिक सिस्टीम वापरण्याला मनाई केल्याचे सांगितले. त्यावेळी मी त्यांना सर्वच ठिकाणी माईकवर बंदी घालता येऊ शकते का?  कुठल्याही धर्मस्थळामधून माईकाचा आवाज बाहेर येणार नाही हे सुनिश्चित करता येईल का? असा प्रतिप्रश्न केला. जर अशा प्रकारे आपल्याला बंदीची अंमलबजावणी करता येत नसेल तर, यात्रा नेहमीसारखी चालू राहिल असे मी त्यांना सांगितले