लाउडस्पीकर बंदी घालायची असेल तर सर्व धार्मिक स्थळांवर सुद्धा घालावी लागेल - योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 09:49 PM2017-08-17T21:49:53+5:302017-08-17T22:01:06+5:30

कावड यात्रेदरम्यान लावण्यात येणा-या लाउडस्पीकरवरुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लाउडस्पीकर बंदी घालायचीच असेल तर सर्व धार्मिक स्थळांवर सुद्धा घालावी लागेल, असे म्हटले आहे. 

If you want to impose a loudspeaker, you must also add it to all religious places - Yogi Adityanath | लाउडस्पीकर बंदी घालायची असेल तर सर्व धार्मिक स्थळांवर सुद्धा घालावी लागेल - योगी आदित्यनाथ

लाउडस्पीकर बंदी घालायची असेल तर सर्व धार्मिक स्थळांवर सुद्धा घालावी लागेल - योगी आदित्यनाथ

Next

लखनऊ, दि. 17 -  कावड यात्रेदरम्यान लावण्यात येणा-या लाउडस्पीकरवरुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लाउडस्पीकर बंदी घालायचीच असेल तर सर्व धार्मिक स्थळांवर सुद्धा घालावी लागेल, असे म्हटले आहे.
मोठ्या थाटामाटात सुरु झालेली कावड यात्रा संपली असून या कावड यात्रेदरम्यान लाउडस्पीकर लावण्यात आले होते. या लाउडस्पीकरवरुन अनेक तक्ररी दाखल करण्यात आल्या आहेत. दरम्यान, बुधवारी रात्री एका कार्यक्रमात लाउडस्पीकर बंदी बाबत बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, मला आश्चर्य वाटते. जेव्हा कावड यात्रेत असे सांगितले की डीजे, माईकचा वापर केला जाऊ नये आणि गाणी लावली जाऊ नयेत. माझा सवाल असा आहे, गाणी लावली नाहीत, तर ती कावड यात्रा की प्रेतयात्रा ?
याचबरोबर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, जर डमरु, ढोल, संगीत नसेल तर कावड यात्रा कशी होईल. मी याआधीही म्हटले होते, कावड यात्रेत अशाप्रकारची कोणतीही बंदी राहणार नाही. गाजियाबादपासून हरिद्वारपर्यंत जवळपास चार कोटी कावड यात्रेकरु होते. मात्र यामधून लाउडस्पीकर बंदीची एकही तक्रार आली नाही. मात्र, तुम्ही  भाविकांच्या भावना दुखावल्या, तर याचा परिणाम होईल. तसेच, मुख्यमंत्री म्हणाले, जर लाउडस्पीकरवर बंदी घालायची असेल तर सर्व धार्मिक स्थळांवर घालावी लागेल आणि असे शक्य नसेल तर कावड यात्रा अशीच सुरु राहील. 

Web Title: If you want to impose a loudspeaker, you must also add it to all religious places - Yogi Adityanath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.