शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

योगी सरकारने प्रायश्चित्त करावं; आरएसएस नेत्याचे खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 09:31 IST

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये झालेल्या ७० मुलांच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना खडे बोल सुनावले आहेत.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये झालेल्या ७० मुलांच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना खडे बोल सुनावले आहेत. अवध क्षेत्राचे आरएसएसचे प्रांत संघचालक प्रभु नारायण यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून योगी सरकारवर टीका केली आहे.या प्रकरणाच्या कायदेशीर कारवाईत कोणीही दोषी ठरलं तरी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी राज्य सरकारचीच आहे.

नवी दिल्ली, दि. 16- उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये झालेल्या ७० मुलांच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना खडे बोल सुनावले आहेत. अवध क्षेत्राचे आरएसएसचे प्रांत संघचालक प्रभु नारायण यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून योगी सरकारवर टीका केली आहे.प्रभु नारायण यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हंटलं,  'या प्रकरणाच्या कायदेशीर कारवाईत कोणीही दोषी ठरलं तरी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी राज्य सरकारचीच आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या सर्व मंत्री आणि उत्तर प्रदेश भाजपच्या सदस्यांनी याचं प्रायश्चित्त करायला हवं.' ​ राज्य सरकारने एक 'प्रायश्चित्त दिवस' आयोजित करावा, असा सल्ला प्रभु यांनी त्यांच्या फेसबुक  पोस्टमधून योगी सरकारला दिला आहे.'राज्य सरकारच्या सर्व मंत्र्यांनी पीडित मुलांच्या शोकाकुल कुटुंबीयांचं सांत्वन त्यांच्या घरी जाऊन तर करायला हवंच, पण त्यासोबतच एक दिवसाचा उपवास करायला हवा. अशा संवेदनशील परिस्थितीच्या सामना कसा करायचा ते या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शिकायला हवं, असं प्रभु नारायण यांनी या संदर्भात इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हंटलं आहे.

आणखी बातम्या वाचा(सैनिकांनो बंदुकी मोडा अन् काश्मिरींना मिठ्या मारा, सामनातून मोदींवर टीका)(नायजेरियात बोको हरामच्या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू, 82 जखमी)(आस्थेच्या नावाखाली हिंसाचार खपवून घेणार नाही- मोदी)

'चौकशी करून फक्त काही लोकांना बळीचा बकरा बनवण्याने काही उपयोग होणार नाही. गोरखपूर घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ आणि आरोग्य मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरही नारायण प्रभु यांनी टीका केली आहे.  विद्यमान सरकारने या पत्रकार परिषदेत मागच्या मृत्यूंची आकडेवारी देणं योग्य नव्हतं. तो फक्त आकड्यांचा खेळ वाटला, त्यात संवेदनशीलता नव्हती, असं नारायण प्रभु यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

नारायण प्रभु म्हणाले, आपण कोणत्याही मंत्र्याचा राजीनामा मागत नाही आहोत आणि राजकीय विचारांनी बोलत नाही आहोत. 'देशात भाजपाव्यतिरिक्त कोणताही राजकीय पर्याय नाही. भाजपचं कोणतंही नुकसान होऊ नये असं मला वाटतं. सरकारमध्ये आमची लोक खूप साधारण आणि स्पष्ट आहेत. म्हणूनच गोरखपूर घटनेनंतर झालेली पत्रकार परिषद अनुभवी अधिकाऱ्यांनी घ्यायला हवी होती. जर आमचे राजकारणी आणि मंत्री अशा विषयांवर बोलतात तर त्यांच्या बोलण्यातून संवेदनशीलचा आणि दुःख लोकांच्या समोर यायला हवं.