शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

CAA : नागरिकत्व दुरुस्ती कायदा सर्वात आधी लागू करणार, योगी सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 13:22 IST

उत्तर प्रदेशात नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे.

लखनऊ : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर संपूर्ण देशात या कायद्याला विरोध होत आहे. यातच केंद्र सरकारने गेल्या शुक्रवारपासून हा कायदा देशात लागू केला असून, याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचना जारी केल्यानंतर हा कायदा देशात पहिल्यांदा उत्तर प्रदेशात लागू करण्यात येणार असल्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे, उत्तर प्रदेशात नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे.

देशात सर्वात आधी नागरिकत्व दुरुस्ती कायदा आम्ही लागू करणार आहोत, असे योगी सरकारमधील मंत्री आणि प्रवक्ते सिद्धार्थनाथ सिंह यांनी शनिवारी सांगितले. यासंदर्भातील अधिसूचना जारी झाल्यानंतर नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे डिटेल्स राज्याला मिळतील, त्यानंतर नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करणारे सर्वात आधीचे राज्य उत्तर प्रदेश असणार आहे, असे सिद्धार्थनाथ सिंह म्हणाले. दुसरीकडे, योगी सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायद्यानुसार पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगानिस्तानमधून आलेल्या शरणार्थींची माहिती घेण्याचे काम सुरु केले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 2014 पासून जे लोक राहत आहेत, अशा लोकांच्या नावांची यादी तयार करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, सरकारने यासंबंधी अद्याप कोणताही लिखित आदेश जारी केला नाही. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी शरणार्थींची माहिती घेण्याचे काम सुरु केले आहे. पिलीभीत जिल्हा प्रशासनाने यासंबंधी आकडे सरकारकडे पाठविले आहेत.   

पिलीभीत जिल्ह्यात पाकिस्तान आणि बांगलादेशातून आलेले शरणार्थी विविध भागात घरे बांधून मोठ्या संख्येने राहत आहेत. तालुका स्तरावर जाऊन अधिकारी शरणार्थींची गणना करत आहेत. आतापर्यंत जवळपास 37 शरणार्थींची माहिती गोळ्या करण्यात आली आहे, ज्यांना नागरिकता दिली जाणार आहे. तसेच,ही माहिती शासनाला पाठविण्यात आल्याचे येथील जिल्हाधिकारी वैभव श्रीवास्तव यांनी सांगितले. 

(नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले मोठे विधान, म्हणाले.... )

( केंद्र सरकारची अधिसूचना जारी, देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू)

(सीएए, एनआरसी रद्द करा; ममता बॅनर्जी यांची मोदींकडे मागणी)

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक