शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
2
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
3
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
4
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
5
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
8
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
9
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
10
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
13
एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या
14
बाथरुममधील बादली खूपच खराब झालीय? एकही रुपया खर्च न करता 'अशी' दिसेल नव्यासारखी
15
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
16
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
17
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
18
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
19
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
20
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत

Yogi Adityanath : समाजवादी पार्टी माफिया आणि दहशतवाद्यांची समर्थक, योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 12:21 IST

UP Election 2022 : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी समाजवादी पार्टीवर (Samajwadi Party) जोरदार निशाणा साधला आहे.

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (UP Election 2022) सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सुरू झाला आहे. या प्रचारादरम्यान नेत्यांच्या भाषणबाजीने राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी समाजवादी पार्टीवर (Samajwadi Party) जोरदार निशाणा साधला आहे.

यासंदर्भात योगी आदित्यनाथ यांनी ट्विट केले आहे. '2017 मध्ये भाजपाचे सरकार स्थापन होताच आम्ही तीन गोष्टी केल्या, ज्यात बेकायदेशीर कत्तलखाने बंद करणे, मुलींच्या सुरक्षेसाठी अँटी रोमियो पथक तयार करणे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे यांचा समावेश होता. तसेच 2012 मध्ये समाजवादी पार्टीचे सरकार स्थापन झाल्यावर सर्वप्रथम श्री रामजन्मभूमीवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे खटले मागे घेण्यात आले होते, असे सांगत योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पार्टीवर टीका केली. 

याचबरोबर, जे फुकटात वीज देण्याचे बोलतात त्यांनी उत्तर प्रदेशला अंधारात टाकले. त्यांच्या काळात फक्त अंधार होता, जे उरले होते, ते दंगली आणि कर्फ्यू पूर्ण करत होते. जेव्हा वीज दिली जात नाही, तेव्हा 'फुकट' काय देणार? असा सवाल करत आदित्यनाथ योगी यांनी समाजवादी पार्टीवर हल्लाबोल केला. याआधी शनिवारी आदित्यनाथ योगी म्हणाले होते की, 10 मार्चला समाजवादी पार्टीने पुन्हा एकदा लाजिरवाण्या पराभवासाठी सज्ज राहावे. इतकेच नाही तर याआधी आदित्यनाथ योगी यांनी अनेकवेळा समाजवादी पार्टीला माफिया आणि दहशतवाद्यांचे समर्थक असल्याचे म्हटले आहे. 

'कैरानाच्या माध्यमातून ते येथे काश्मीर बनवण्याचे स्वप्न पाहत होते'तत्पूर्वी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी बुलंदशहर येथे सांगितले होते की, भाजपा सुरक्षा आणि विकासाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करणार नाही. ते म्हणाले की, समाजवादी पार्टीने गुन्हेगारांना उमेदवार घोषित करून 'विनाशाची यादी' जारी केली आहे. कैरानाच्या माध्यमातून ते येथे काश्मीर बनवण्याचे स्वप्न पाहत होते. आम्ही अशा घटकांना सांगितले आहे - काश्मीर आता स्वर्ग बनत आहे आणि पश्चिम उत्तर प्रदेश विकासाच्या नवीन शिखरांना स्पर्श करत आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात विधानसभा निवडणूकदरम्यान, यावेळी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागांसाठी सात टप्प्यांत निवडणुका होणार असून 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. उत्तर प्रदेशामध्ये 10 फेब्रुवारी रोजी राज्याच्या पश्चिम भागातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर मतदान होऊन विधानसभा निवडणुकीची सुरुवात होणार आहे. त्यानंतर 14 फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात 55 जागांसाठी, 20 फेब्रुवारीला तिसऱ्या टप्प्यात 59 जागांसाठी, 23 फेब्रुवारीला चौथ्या टप्प्यात 60 जागांसाठी, 27 फेब्रुवारीला पाचव्या टप्प्यात 60 जागांसाठी, 3 मार्चला सहाव्या टप्प्यात 57 जागांसाठी आणि 7 मार्चला सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 54 जागांसाठी मतदान होणार आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथAkhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपा