शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

'काँग्रेसची शहजादी' लहान मुलांना शिकवतेय शिव्या, योगींचा प्रियंका गांधींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 10:44 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. योगी यांनी प्रियंका यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख हा 'काँग्रेसची शहजादी' असा केला आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. योगी यांनी प्रियंका यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख हा 'काँग्रेसची शहजादी' असा केला आहे. शक्रवारी (3 मे) फतेहपूरमध्ये एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी योगी आदित्यनाथ  यांनी प्रियंका गांधीवर टीका केली.

रायबरेली/फतेहपुर/बांदा - राजकीय पक्षांच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. प्रचारसभांमधून अनेक नेते एकमेकांवर घणाघाती टीका करताना पाहायला मिळत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. योगी यांनी प्रियंका यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख हा 'काँग्रेसची शहजादी' असा केला आहे. शक्रवारी (3 मे) फतेहपूरमध्ये एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी योगी आदित्यनाथ  यांनी प्रियंका गांधीवर टीका केली आहे. 

'ज्या वयात लहान मुलांवर चांगले संस्कार करायला हवेत, 'काँग्रेसची शहजादी' त्यांना शिव्या द्यायला शिकवत आहे... हेच काँग्रेसचं खरं चरित्र आहे' असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्यासमोर अमेठीत काही लहानग्यांनी 'चौकीदार चोर है'ची घोषणा दिली होती. लहान मुलं चौकीदार चौर हैच्या घोषणा देत असल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. 

प्रियंका गांधी यांच्या विरोधात राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा(NCPCR)नं निवडणूक आयोगाला पत्र लिहून प्रियंका गांधींची तक्रार केली होती. व्हायरल झालेला व्हिडीओ हा 1 मे रोजीचा आहे. व्हिडीओवरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनीही प्रियंका गांधींवर टीका केली होती. व्हिडीओमध्ये लहान मुलं पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवीगाळ करत असल्याचं ऐकायलं मिळतं.

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा(NCPCR)नं व्हिडीओसंदर्भात लिहिलं होतं की, प्रियंका गांधी यांच्या समोर लहान मुलं ज्या पद्धतीनं देशाचे पंतप्रधानांविरोधात घोषणाबाजी करत आहे, त्यांना शिवीगाळ करत आहेत, ती मुलांच्या विकासासाठी चांगली गोष्ट नाही. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा(NCPCR)नं निवडणूक आयोगाला पत्र लिहून लहान मुलांना निवडणूक प्रचार आणि निवडणुकीसंदर्भातील गोष्टींमध्ये सामील करू घेऊ नये, हे तुम्ही सुनिश्चित करण्याचं सुचवलं आहे. लहान मुलांचा वापर कोणतीही चिठ्ठी, घोषणबाजी आणि रॅलीमध्ये केला जाऊ नये, अशी मागणीही राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा(NCPCR)नं केली होती. तसेच या प्रकरणात प्रियंका गांधींवर कारवाई करावी, असंही राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा(NCPCR)नं निवडणूक आयोगाला म्हटलं होतं. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyogi adityanathयोगी आदित्यनाथPriyanka Gandhiप्रियंका गांधीfatehpur-pcफतेहपूरBJPभाजपाcongressकाँग्रेस