योगी आदित्यनाथ म्हणतात, अनुपम खेर हे ‘व्हिलन’

By Admin | Updated: March 10, 2016 02:54 IST2016-03-10T02:54:15+5:302016-03-10T02:54:15+5:30

अनुपम खेर यांना रियल लाईफमधील व्हिलन (खलनायक) असे संबोधत खा. योगी आदित्यनाथ यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. खेर यांनी अलीकडेच एका परिसंवादात असहिष्णुतेबाबत बोलताना

Yogi Adityanath says, Anupam Kher is 'Villean' | योगी आदित्यनाथ म्हणतात, अनुपम खेर हे ‘व्हिलन’

योगी आदित्यनाथ म्हणतात, अनुपम खेर हे ‘व्हिलन’

गोरखपूर (उत्तर प्रदेश) : अनुपम खेर यांना रियल लाईफमधील व्हिलन (खलनायक) असे संबोधत खा. योगी आदित्यनाथ यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. खेर यांनी अलीकडेच एका परिसंवादात असहिष्णुतेबाबत बोलताना खा. आदित्यनाथ आणि साध्वी प्राची यांना गजाआड करायलाच हवे या रोखठोक भाषेत भाजपला घरचा अहेर दिला होता.
त्यावर प्रतिक्रिया देताना आदित्यनाथ मंगळवारी म्हणाले की, सर्वांना खलनायकाच्या चारित्र्याची माहिती असते. अनुपम हे केवळ पडद्यावरच नव्हे तर प्रत्यक्ष आयुष्यातही व्हिलन आहेत.

खेर यांनी कोलकात्यात दिलेल्या निवेदनाबद्दल मी यापेक्षा जास्त काही बोलू शकत नाही.
आदित्यनाथ आणि साध्वी प्राची मूर्खपणे बोलत(बकवास)असतात, त्यांची भाजपमधून हकालपट्टी करायलाच हवी, असेही खेर यांनी म्हटले होते.(वृत्तसंस्था)

Web Title: Yogi Adityanath says, Anupam Kher is 'Villean'