शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Gorakhpur Election: योगी आदित्यनाथ माझे प्रभू श्रीराम, भाजपा उमेदवार रवी किशनचं वक्तव्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 17:19 IST

उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ हे माझे प्रभू श्री राम आहेत तर मी त्यांचा भरत आहे असं वक्तव्य अभिनेता रवी किशन यांनी केलेले आहे

नवी दिल्ली - गोरखपूर लोकसभा मतदारसंघातभाजपाकडून निवडणूक लढवत असलेले भोजपुरी अभिनेता रवी किशन सध्या एका विधानाने चर्चेत आहेत. उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ हे माझे प्रभू श्री राम आहेत तर मी त्यांचा भरत आहे असं वक्तव्य अभिनेता रवी किशन यांनी केलेले आहे. आज तक या हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलेले आहे. 

या मुलाखतीत रवी किशन म्हणतात की, गोरखपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नि:स्वार्थ भावनेने करत असलेलं कामाकडे पाहून जनता मला मतदान करेल. या मतदारसंघात मला कोणाचंही आव्हान नसून उत्तर प्रदेशातील सपा-बसपा महाआघाडीचा फ्लॉप चित्रपटासारखा फ्लॉप शो अशी स्थिती झाली आहे. 

गोरखपूर लोकसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आहेत. या जागेवर १९९१ पासून भारतीय जनता पार्टीने सलग विजय मिळवला आहे. मात्र २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर या लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या विजयाचं गणित बिघडलं. २०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत सपा उमेदवार प्रवीण निषाद यांनी भाजपाचे उमेदवार उपेंद्र दत्त शुक्ला यांचा पराभव केला होता. २०१९ मध्येही गोरखपूर मतदारसंघ पुन्हा भाजपाच्या ताब्यात घेण्यासाठी भाजपाने प्रयत्न केले आहेत. 

तसेच मंदिर आमची आस्था आहे आणि पार्टी देशसेवेचे माध्यम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आशीर्वादाने निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. मी गोरखनाथ मदिरापासून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. माझा प्रवास येथूनच सुरु होणार असल्याचा विश्वास रवी किशन यांनी व्यक्त केला. 

काँग्रेसमधून भाजपात सहभागी झालेल्या रवी किशनला भाजपात प्रवेश केल्याने काय फायदा होईल असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, देशभक्ती सर्वात आधी आहे. देशभक्तीची प्रेरणा आमच्या पंतप्रधानांपासून मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत आम्हीही चौकीदार झालो आहोत. हिंदू संस्कृती आणि संस्कार यांचे रक्षण करण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेमुळे जगात देशाचं नावं उंचावत चाललं आहे.   

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथgorakhpur-pcगोरखपुर