शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ अयोध्येतून निवडणूक लढवणार? यूपीसाठी आज भाजपाची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 07:48 IST

Uttar Pradesh Assembly Polls: भाजपाने 300 जागांसाठी उमेदवारांच्या नावांची छाननी केली असून आज दिल्लीत होणाऱ्या भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत यापैकी 175 जागांसाठी उमेदवारांच्या नावांना ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सर्व पक्षांना बाजी मारायची आहे. भारतीय जनता पार्टीच्या (BJP) विरोधात असलेल्या सर्व पक्षांचा एकच प्रयत्न आहे की, उत्तर प्रदेशात मोदींना घेरण्याचा आणि भाजपचा पराभव करण्याचा आहे. दरम्यान, भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक दोन दिवसांपासून दिल्लीत होत असून आज संध्याकाळपर्यंत भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी येईल, असे वृत्त आहे. भाजपाने 300 जागांसाठी उमेदवारांच्या नावांची छाननी केली असून आज दिल्लीत होणाऱ्या भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत यापैकी 175 जागांसाठी उमेदवारांच्या नावांना ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता आहे.

केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी येईल. भाजपा आपल्या विद्यमान आमदारांची अधिक तिकिटे कापण्याच्या मनस्थितीत नाही, परंतु गेल्या निवडणुकीत भाजपाने गमावलेल्या 90 जागांपैकी निम्म्या जागांवर उमेदवार बदलले जाऊ शकतात. काही मंत्र्यांच्या जागाही बदलल्या जाऊ शकतात, अशी माहिती मिळत आहे. आज येणाऱ्या यादीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही नाव असल्याचा दावा करण्यात आला आहे. योगी आदित्यनाथ अयोध्येतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. काल या मुद्द्यावर चर्चा झाली. 

अयोध्या हे हिंदुत्व आणि विकास या दोन्हींचे मॉडेल आहे, त्यामुळे योगींनी तिथून निवडणूक लढवावी, यातून संपूर्ण अवध प्रदेशालाही संदेश जाईल, असे पार्टीच्या नेत्यांचे मत आहे. योगी आदित्यनाथ यांचेही नाव पहिल्या यादीत असण्याची शक्यता आहे. काल झालेल्या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दोन्ही उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि दिनेश शर्मा, यूपी भाजपा अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, भाजपाचे संघटनेचे सरचिटणीस बीएल संतोष उपस्थित होते. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि उत्तर प्रदेश भाजपाचे प्रभारी राधामोहन या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यांत निवडणुका होणार असून त्याची सुरुवात 10 फेब्रुवारी रोजी राज्याच्या पश्चिम भागातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर मतदान होणार आहे. योगी आदित्यनाथ सध्या विधान परिषदेचे सदस्य आहेत. आपण विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी नुकतेच सांगितले होते परंतु त्याबाबत कोणताही अंतिम निर्णय भाजपाचे वरिष्ठ नेतृत्व घेईल. तसेच, योगी आदित्यनाथ यांना अयोध्येतून उमेदवारी देण्याबाबत पक्षांतर्गत चर्चा सुरू झाली असली तरी अंतिम निर्णय पक्षाची केंद्रीय निवडणूक समिती (CEC) घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून उमेदवारांची नावे अंतिम केली जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या समितीचे सदस्य आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी केंद्रीय निवडणूक समितीची लवकरच बैठक होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 14 फेब्रुवारीला राज्यातील 55 जागांसाठी मतदान होणार आहे. योगी आदित्यनाथ यांच्यासाठी अयोध्येव्यतिरिक्त, मथुरा आणि गोरखपूर या दोन जागा आहेत. या जागेवरून भाजपा नेतृत्वाने योगी आदित्यनाथ यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्यास ते निवडणुकीच्या रिंगणात येऊ शकतात.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपा