शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

"पंतप्रधान नरेंद्र मोदी देवाचा अवतार, संपूर्ण भारत त्यांचं ऐकतो"; भाजपाच्या मंत्र्याचं अजब विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 16:43 IST

Gulab Devi And Narendra Modi : गुलाब देवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली आहे. पण हे करताना त्यांनी एक अजब विधान केलं आहे.

योगी आदित्यनाथ सरकारमधील माध्यमिक शिक्षण मंत्री गुलाब देवी (Gulab Devi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची स्तुती केली आहे. पण हे करताना त्यांनी एक अजब विधान केलं आहे. एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी हे एक असामान्य व्यक्तिमत्व आहे. त्यांची इच्छा असेल तर ते आयुष्यभर पंतप्रधान राहू शकतात. ते देवाचा अवतार आहेत. त्यांना जसं हवं तसं ते करतात हवं. संपूर्ण भारत त्यांचं ऐकतो. यापेक्षा मोठी ओळख कोणती असू शकते? असं म्हटलं आहे. 

मंत्री गुलाब देवी संभलच्या चंदौसी विधानसभा मतदारसंघातील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. "नरेंद्र मोदी काही लोकांमुळे पंतप्रधानपदावरून पायउतार होणार नाहीत. दुसरं कोणी येणार नाही. त्यांना जेव्हा जसं हवं तेव्हा ते तसं करतात. त्यांना हवे असेल तर ते घंटा वाजवतात, त्यांना हवे असल्यास ते मजीरा वाजवतात. ते काहीही करू शकतात" असं गुलाब देवी यांनी म्हटलं आहे. 

"पंतप्रधान मोदीजी एक अवतार”

कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर पत्रकारांनी मंत्र्यांना विचारले होते की, देशात अल्पसंख्याक पंतप्रधान होण्यासाठी अनेक नेते प्रयत्न करत आहेत. त्यावर गुलाब देवी म्हणाल्या की, ही लोकशाही आहे. येथे कोणीही भाषणबाजी करू शकतो, कोणतेही बंधन नाही. याला आपण फारसे महत्त्व देत नाही. पंतप्रधान मोदीजी एक अवतार आहेत. ते विलक्षण प्रतिभेचे आहेत.

गुलाब देवी चार वेळा आमदार 

चंदौसी विधानसभेतून गुलाब देवी चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. यापूर्वीच्या योगी सरकारमध्ये त्या राज्यमंत्रीही होत्या. यावेळी त्यांना माध्यमिक शिक्षण मंत्री करण्यात आले आहे. पेशाने शिक्षिका असलेल्या गुलाब देवी 1991 पासून भाजपामध्ये आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारण