योगदिनी विश्वविक्रमाची जय्यत तयारी
By Admin | Updated: June 16, 2015 02:43 IST2015-06-16T02:43:25+5:302015-06-16T02:43:25+5:30
जागतिक योगदिनी संपूर्ण जगापुढे भारताचा बोलबाला व्हावा या दृष्टिकोनातून मोदी सरकारने आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे.

योगदिनी विश्वविक्रमाची जय्यत तयारी
नितीन अग्रवाल , नवी दिल्ली
जागतिक योगदिनी संपूर्ण जगापुढे भारताचा बोलबाला व्हावा या दृष्टिकोनातून मोदी सरकारने आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनंतर आता सरकारने राष्ट्रीय कॅडेट कोरच्या (एनसीसी) १० लाख कॅडेटस्लासुद्धा या कार्यक्रमात सहभागी करून घेतले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २१ जूनला जागतिक योग दिनी देशभरातील १९०० केंद्रांवर एकाच वेळी योगासने केली जातील.