शाळा तपासणीबरोबरच योगासनाचे धडे
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:25+5:302014-12-20T22:27:25+5:30
औसा : नागरसोगा येथील जिल्हा परिषद शाळा तपासणीसाठी शनिवारी सकाळी ८़२० वाजता गटशिक्षणाधिकारी शाळेत हजर होऊन त्यांनी विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे दिले़ त्यामुळे गावात एकच चर्चा सुरु होती़

शाळा तपासणीबरोबरच योगासनाचे धडे
औ ा : नागरसोगा येथील जिल्हा परिषद शाळा तपासणीसाठी शनिवारी सकाळी ८़२० वाजता गटशिक्षणाधिकारी शाळेत हजर होऊन त्यांनी विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे दिले़ त्यामुळे गावात एकच चर्चा सुरु होती़नागरसोगा येथील जिल्हा परिषद शाळेत गटशिक्षणाधिकारी उज्ज्वल कुलकर्णी तपासणीसाठी शनिवारी सकाळी आले होते़ प्रार्थना झाली आणि स्वत: त्यांनी तब्बल दीड तास विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह योगाची धडे दिले़ विद्यार्थीही यात तन्मयतेने सामील झाले़ यावेळी मुख्याध्यापक गणेश दीक्षित, विठ्ठल बोडके, संजय जगताप, चौधरी, माधुरी भुरे, बनसोडे, काळे, उडते यांच्यासह शिक्षकांची उपस्थिती होती़