होय... माझं दाऊद इब्राहिमशी बोलणं झालं होतं - राम जेठमलानी

By Admin | Updated: July 4, 2015 11:53 IST2015-07-04T11:53:07+5:302015-07-04T11:53:07+5:30

होय, दाऊद इब्राहिमशी माझं बोलणं झालं होतं आणि मी बाँबस्फोट घडवले नसल्याचं सांगत भारतात परत यायला उत्सुक आहे असंही त्यांनं सांगितल्याचं राम जेठमलानी यांनी ANI या वृत्तसंस्थेला

Yes ... I was speaking to Dawood Ibrahim - Ram Jethmalani | होय... माझं दाऊद इब्राहिमशी बोलणं झालं होतं - राम जेठमलानी

होय... माझं दाऊद इब्राहिमशी बोलणं झालं होतं - राम जेठमलानी

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ४ - होय, दाऊद इब्राहिमशी माझं बोलणं झालं होतं आणि मी बाँबस्फोट घडवले नसल्याचं सांगत भारतात परत यायला उत्सुक आहे असंही त्यांनं सांगितल्याचं राम जेठमलानी यांनी ANI या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे. टाइम्स ऑफ इंड़ियामध्ये आलेल्या छोटा शकीलच्या मुलाखतीचा संदर्भ देताना, त्यात चूक असून मी शकीलशी नाही दाऊदशीच बोलल्याचं जेठमलानी म्हणाले.

मी निष्पाप असून माझा बाँबस्फोटांशी काहीही संबंध नाह असं त्याचं वक्तव्य होतं आणि मी भारतात यायला तयार आहे असंही दाऊद म्हणाला. मी हे सगळं लेखी स्वरुपात शरद पवारांना दिलं. परंतु बहुदा त्यांच्याही हातात काही नव्हतं कारण अंतिम निर्णय युपीए सरकारनं घेतला. जर, तुमच्याकडे दाऊद विरोधातले भक्कम पुरावे होते तर त्याला भारतात का येऊ दिला नाही असा सवालही जेठमलानी यांनी विचारला आहे.

दाऊदला भारतात आल्यावर पोलीस मारतिल हीच भीती नव्हती तर कदाचित त्याचा खून होईल अशीही भीती होती. त्यामुळे माझ्यावर थर्ड डिग्रीचा वापर होता कामा नये या अटीवर तो भारतात परतायला तयार होता असे जेठमलानी म्हणाले.

 

Web Title: Yes ... I was speaking to Dawood Ibrahim - Ram Jethmalani