शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

हो मी चहा विकला, पण देश नाही विकला - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 18:23 IST

चहा विकण्यावरुन काँग्रेस पक्षाकडून खिल्ली उडवण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेदरम्यान काँग्रेसवर सणसणीत टीका केली आहे

ठळक मुद्देहो मी चहा विकला, पण देश नाही विकला अशा शब्दांत नरेंद्र मोदींनी काँग्रेसला सुनावलं आहे'आपण गरिब कुटुंबातून असल्यामुळे काँग्रेस पक्षातील नेते नेहमीच आपला तिरस्कार करतात'गुजरातमधील राजकोटमध्ये प्रचारसभेत ते बोलत होते

नवी दिल्ली - चहा विकण्यावरुन काँग्रेस पक्षाकडून खिल्ली उडवण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेदरम्यान काँग्रेसवर सणसणीत टीका केली आहे. हो मी चहा विकला, पण देश नाही विकला अशा शब्दांत नरेंद्र मोदींनी काँग्रेसला सुनावलं आहे. आपण गरिब कुटुंबातून असल्यामुळे काँग्रेस पक्षातील नेते नेहमीच आपला तिरस्कार करतात अशी टीकाही नरेंद्र मोदींनी केली आहे.

'माझ्या गरिब पार्श्वभुमीमुळे काँग्रेस मला नापसंद करतं. एखादा पक्ष इतका खालच्या स्तराला जाऊ शकतो का ? हो गरिब कुटुंबातील एक व्यक्ती पंतप्रधान झाला आहे. यावरुन झालेला संताप ते लोक लपवू शकलेले नाहीत. हो मी चहा विकला, देश विकलेला नाही', असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. गुजरातमधील राजकोटमध्ये प्रचारसभेत ते बोलत होते. 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्यासोबतचा एक फोटो काँग्रेसचे ऑनलाईन मॅगझिन युवा देशने ट्विट केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्यातील संभाषणाचे मीम तयार करण्यात आले होते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, 'विरोधीपक्ष आपल्यावर कशा पद्धतीचे मेमे बनवतात, असे सांगत आहेत. तर त्याला मेमे नाही तर मीम म्हणतात असे ट्रम्प यांनी मोदीं सांगितले. तर थेरेसा मे मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना 'तुम्ही चहाच विका' असे अपमानास्पद व वादग्रस्त मीम तयार करण्यात आले. काँग्रेसची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चौफेर टीका होऊ लागली.  त्यानंतर काँग्रेसनं तातडीने हे ट्विट डिलीट केलं.

काँग्रेसने हाफिज सईदच्या सुटकेचा आनंद साजरा केला -याआधी भूज येथे झालेल्या सभेत नरेंद्र मोदींनी काँग्रेसने पाकिस्तानी दहशतवादी आणि मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या सुटेकेचे सेलिब्रेशन साजरे केले असा आरोप केला. 

लष्कर-ए-तय्यबाचा प्रमुख हाफिज सईदची सुटका हे मोदी सरकारचे कुटनितीक अपयश आहे अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केली होती. त्याला उत्तर देताना मोदींनी काँग्रेसने हाफिज सईदच्या सुटकेचा आनंद साजरा केल्याचा आरोप केला. पाकिस्तानी कोर्टाने पाकिस्तानी दहशतवाद्याची सुटका केली आणि काँग्रेस या सुटकेचा आनंद साजरा करत आहे. मला याचे आश्चर्य वाटते. हीच काँग्रेस स्वत:च्या लष्कराच्या सर्जिकल स्ट्राईकवर विश्वास ठेवत नाही पण चीनच्या राजदूतावर विश्वास ठेवते असा आरोप मोदींनी केला. 

डोकलाममध्ये आपले सैन्य 70 दिवसांपासून चीनच्या नजरेला नजर भिडवून उभे होते. त्यावेळी तुम्ही चिनी राजदूतांना मिठी का मारली ? असा सवाल मोदींनी विचारला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017congressकाँग्रेस