येवल्यात विवाहितेचा छळप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
By Admin | Updated: May 9, 2014 23:07 IST2014-05-09T21:13:27+5:302014-05-09T23:07:21+5:30
येवला : येवल्यातील एका विवाहितेचा पती, सासू, दोन ननंदा यांनी शारीरिक मानसिक छळ करून, माहेरून दोन लाख रुपये आणण्याची मागणी केल्याच्या कारणांवरून शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

येवल्यात विवाहितेचा छळप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
येवला : येवल्यातील एका विवाहितेचा पती, सासू, दोन ननंदा यांनी शारीरिक मानसिक छळ करून, माहेरून दोन लाख रुपये आणण्याची मागणी केल्याच्या कारणांवरून शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
पल्लवी जितेंद्र निकम (रा. येवला), या २४ वर्षीय विवाहितेने येवला शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, मार्च २०१२ ला विवाह झाल्यानंतर महिन्यात तुला घरकाम येत नाही, स्वयंपाक येत नाही, तुझा पायगुण चांगला नाही अशा कारणांवरून, पती सासू व दोघी नणंदांनी तिला उपाशी ठेवून मारहाण करीत शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. पतीच्या कायमस्वरूपी नोकरीसाठी माहेरून दोन लाख रुपये आणण्याची मागणीही केली, असा आरोप केला आहे. याप्रकरणी, विवाहितेचा पती जितेंद्र रामदास निकम (रा. बंदेलपुरा, येवला), सासू लताबाई रामदास निकम, नणंदा जयश्री अशोक पवार (रा. सौंदाणे ता. मालेगाव), योगीता शरद मगर (रा. कामठवाडा, नाशिक) आदि चौघांविरोधात, येवला शहर पोलिसांत कलम ४९८, ४०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पो. निरीक्षक रणजित डेरे, बी. व्ही. सांगळे तपास करीत आहेत. (वार्ताहर)
----