येमेन हल्ला: १३ भारतीय जिवंत, ७ बेपत्ता

By Admin | Updated: September 9, 2015 12:54 IST2015-09-09T12:31:33+5:302015-09-09T12:54:24+5:30

सौदीतील येमेनमधील हवाई हल्ल्यात २० भारतीय ठार झाल्याचे वृत्त चुकीचे असून १३ नागरिक जिवंत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.

Yemen attack: 13 Indians alive, 7 missing | येमेन हल्ला: १३ भारतीय जिवंत, ७ बेपत्ता

येमेन हल्ला: १३ भारतीय जिवंत, ७ बेपत्ता

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - सौदीतील येमेनमधील हवाई हल्ल्यात २० भारतीय ठार झाल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे परराष्ट्र मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. २०पैकी १३ जण जिवंत असून ७ जण बेपत्ता आहेत अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी दिली. 
सौदी अरेबियाकडून येमेनमधील होदायदाह बंदरावरील तेल तस्करांवर मंगळवारी करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात २० भारतीय ठार झाल्याचे वृत्त होते. मात्र हे वृत्त चुकीचे असल्याचे सांगत १३ नागरिक जिवंत असल्याचे स्वरूप म्हणाले. द्जिबौटी येथील भारतीय दूतावासातील कर्मचारी स्थानिकांशी संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले. 
 

Web Title: Yemen attack: 13 Indians alive, 7 missing