शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेकिंग! आपण जनतेचा विश्वास गमावलाय! कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा राजीनामा देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 12:22 IST

येडियुरप्पा आज राज्यपालांना भेटून राजीनामा देणार

बंगळुरू: कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा राजीनामा देणार आहेत. दुपारी जेवणानंतर राज्यपालांना भेटून त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करणार असल्याची माहिती येडियुरप्पांनी दिली. कर्नाटकमधील येडियुरप्पा सरकारला २ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनामा देणार असल्याची माहिती दिली. गेल्या अनेक दिवसांपासून येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती. आपण राजीनामा देणार नसल्याचं येडियुरप्पांनी म्हटलं होतं. त्यानंतर दिल्लीत बैठकांचं सत्र सुरू होतं. अखेर येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे.गेल्या अनेक आठवड्यांपासून कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात येडियुरप्पांच्या राजीनाम्याची चर्चा होती. अखेर आज येडियुरप्पांनी व्यासपीठावरून राजीनाम्याची घोषणा केली. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. जनतेचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही, असं येडियुरप्पा म्हणाले. 'माझ्यावर कर्नाटकच्या जनतेचं ऋण आहे. जनतेचा आपल्यावर विश्वास राहिलेला नाही, हे मी आमदार आणि अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो. आपण प्रामाणिकपणे काम करायला हवं आणि स्वच्छ प्रशासन द्यायला हवं. अनेक अधिकारी प्रामाणिक आहेत. सर्वांनी तसं व्हायला हवं,' अशी अपेक्षा त्यांनी राजीनाम्याची घोषणा करताना बोलून दाखवली. 

मुख्यमंत्रिपदी कायम राहणार की नाही, याचा निर्णय सोमवारी होईल असं येडियुरप्पा यांनी दोनच दिवसांपूर्वी म्हटलं होतं. आपण पुढील १० ते १५ वर्षे भाजपसाठी काम करू असंदेखील त्यांनी सांगितलं होतं. ७८ वर्षांचे येडियुरप्पा लिंगायत समाजातील मोठे नेते आहेत. गेल्या २ दशकांपासून ते कर्नाटक भाजपचा चेहरा राहिले आहेत. मुख्यमंत्रिपदी कायम राहायचं की नाही याबद्दल नेतृत्त्वानं कोणताही संदेश दिला नसल्याचं येडियुरप्पांनी काल संध्याकाळी म्हटलं होतं. 

विशेष म्हणजे येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा करण्यापूर्वी भाजपचे सचिव सी. टी. रवी यांनी त्यांचं अभिनंदन केलं होतं. 'मुख्यमंत्रिपदी २ वर्ष पूर्ण केल्याबद्दल येडियुरप्पांचं अभिनंदन. ते कर्नाटक आणि भाजपला मार्गदर्शन करत राहतील,' असं रवी यांनी  म्हटलं होतं. यानंतर पुढच्या काही मिनिटांत येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली. येडियुरप्पांनी पायउतार होण्याआधी पक्षासमोर ३ अटी ठेवल्याचं बोललं जातं. एका मुलाला केंद्रात, तर दुसऱ्याला राज्यात मंत्रिपद आणि पुढील मुख्यमंत्री आपल्याच मर्जीतील अशा तीन अटी येडियुरप्पांनी नेतृत्त्वासमोर ठेवल्या होत्या अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

टॅग्स :B. S. Yeddyurappaबी. एस. येडियुरप्पाBJPभाजपा