शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खासगी क्षेत्रात स्थानिकांना 75% आरक्षण; राज्य सरकार नवा कायदा करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 20:58 IST

विधेयकाचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू

बंगळुरु: खासगी उद्योगांसह सर्वच क्षेत्रांमध्ये स्थानिकांना ७५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय कर्नाटक सरकारकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. या कायद्याचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी विधानसभेत 'कर्नाटक कारखाने, दुकानं, व्यावसायिक आस्थापनं, एमएसएमई, संयुक्त उद्योग विधेयक' मांडलं जाणार आहे. शेजारच्या आंध्र प्रदेशात गेल्या जुलै महिन्यात असाच निर्णय लागू झाला.आम्ही कोणाच्याही विरोधात नाही. कोणासोबत भेदभाव करण्याचा आमचा अजिबात हेतू नाही. स्थानिकांच्या हितासाठी हा निर्णय घेत असल्याचं राज्याचे कामगार मंत्री एस. सुरेश कुमार यांनी 'सीएनएन-न्यूज१८' वाहिनीशी बोलताना सांगितलं. 'आपल्याच राज्यात भेदभाव होत असल्याची भावना स्थानिकांच्या मनात आहे. रोजगाराच्या फारशा संधी मिळत नसल्याचं त्यांना वाटतं. ही बाब गंभीर आणि चिंताजनक आहे. त्यामुळे संबंधितांशी आणि तज्ज्ञांशी बोलून विधेयकाचा मसुदा तयार करण्यात येईल,' अशी माहिती कुमार यांनी दिली. कन्नडिगांना नोकऱ्यांमध्ये ७५ टक्के आरक्षण देण्याच्या दृष्टीनं पावलं टाकणाऱ्या राज्य सरकारनं कन्नाडिगांची व्याख्यादेखील तयार केली आहे. याबद्दलची अधिसूचना कामगार मंत्रालयानं जारी केली आहे. 'गेल्या १५ वर्षांपासून कर्नाटकात वास्तव्य करणाऱ्या आणि कन्नड भाषा बोलू, लिहू आणि समजू शकणाऱ्या व्यक्तीला कन्नडिगा समजण्यात येईल. कर्नाटकमध्ये नोकरी करायची असल्यास संबंधित व्यक्तीला कन्नड भाषा बोलता, लिहिता यायला हवी,' असंदेखील कुमार म्हणाले. कन्नडिगांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारं विधेयक नेमकं कधी मांडलं जाणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. लवकरच कर्नाटक सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडणार आहे. मात्र या विधेयकाचा मसुदा अद्याप तयार न झाल्यानं ते अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलं जाण्याची शक्यता नाही.  

टॅग्स :reservationआरक्षणKarnatakकर्नाटक